Mi नोटबुक एअर लॅपटॉप लाँच, i5 प्रोसेसरने सुसज्ज

Mi नोटबुक एअर लॅपटॉप लाँच, i5 प्रोसेसरने सुसज्ज
HIGHLIGHTS

Mi नोटबुक 13.3 इंच आणि 12.5 इंच अशा दोन प्रकारात उपलब्ध होईल.

गेल्या अनेक दिवसांपासून शाओमीच्या ज्या नोटबुकविषयी चर्चा होत होती, तो शाओमी MI नोटबुक एअर लॅपटॉप अखेर लाँच झाला. शाओमीने चायनामध्ये एका कार्यक्रमादरम्यान हा लॅपटॉप लाँच केला. हा लॅपटॉप विंडोज 10 वर चालेल. हा 13.3 इंच आणि 12.5 इंच अशा दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ह्याच्या 13.3 इंच वेरियंटची किंमत 4999 युआन (जवळपास ५०००० रुपये) आणि 12.5 इंच वेरियंटची किंमत 3499 युआन (जवळपास ३५००० रुपये) असेल.

Mi नोटबुक एअर लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, हा दोन्ही वेरियंटमध्ये 1080p डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात बॅकलिट कीबोर्डचा वापर केला गेला आहे. हा गोल्ड आणि सिल्वर अशा दोन रंगात उपलब्ध आहे. ह्याचा 13.3 इंच नोटबुकचा आकार 14.8mm आणि वजन 1.28 किलो आहे.

हेदेखील पाहा – [ Marathi] HP elitebook Folio First Look – HP ईलाइटबुक फॉलिओ

तर दुसरीकडे ह्याच्या 12.5 इंच मॉडलचा आकार 12.9mm आणि वजन 1.07 किलो आहे. 13.3 इंचाचा Mi नोटबुक एअर इंटेल i5-6200U प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि हा Nvidia GeForce 940MX GPU दिला गेला आहे. हा डिवाइस 8GB DDR4 रॅमसह येतो. शाओमीनुसार, ह्यात 40Wh बॅटरी दिली गेली आहे, जी ९.५ तासांपर्यंत चालते.

हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

तर 12.5 इंचाचा Mi नोटबुक इंटेल कोर M3 प्रोसेसरवर चालतो आणि ह्यात 128GB SSD सह 4GB रॅम दिली आहे.

हेदेखील वाचा – शाओमी रेडमी प्रो स्मार्टफोन लाँच, 4GB रॅमने सुसज्ज
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाली अॅमेझॉन प्राईम सेवा

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo