भारीच की ! LG ने आणले दमदार फीचर्ससह दोन पावरफुल लॅपटॉप, तब्ब्ल 21 तास चालेल बॅटरी
LG Ultra PC 16U70Q आणि LG Ultra PC 14U70Q लॅपटॉप लाँच
नवीन लॅपटॉप्सची सुरुवातीची किंमत अंदाजे 76,000 रुपये
यात असलेली 72Wh ची बॅटरी तब्बल 21 तास सतत चालेल
LG ने LG Ultra PC 16U70Q आणि LG Ultra PC 14U70Q लॅपटॉप लाँच केले आहेत. हा लॅपटॉप सध्या 14 इंच आणि 16 इंच डिस्प्लेमध्ये उपलब्ध आहे. या दोन लॅपटॉपमध्ये अनेक समानता आहेत, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला AMD Ryzen 5000 सीरीज प्रोसेसर मिळेल, जो लॅपटॉपला सुरळीत काम करण्यास मदत करेल. 16 GB RAM आणि 1 TB पर्यंत SSD स्टोरेज देखील असेल. यावर फुल चार्जमध्ये तुम्ही 21 तास सतत व्हिडिओ पाहता येईल. गेल्या आठवड्यात युरोपमध्ये लाँच झालेला हा लॅपटॉप सध्या खूप चर्चेत आहे. लवकरच ते भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : 5G In India : 'या' 13 शहरांमध्ये 5G सर्वप्रथम लाँच होणार, बघा संपूर्ण यादी
फीचर्स
लॅपटॉपच्या दोन्ही व्हेरिएंटमध्ये अनेक समानता आहेत. LG Ultra PC 16U70Q आणि LG Ultra PC 14U70Q लॅपटॉप 14-इंच आणि 16-इंच अँटी-ग्लेअर IPS डिस्प्ले 1920*1200 पिक्सेल रिझोल्यूशनसह येतात. हा लॅपटॉप 16 GB रॅम आणि 1 TB SSD स्टोरेजसह येतो. बॅटरी पॉवर देखील छान आहे. 72Wh ची बॅटरी तब्बल 21 तास सतत चालेल.
भारतीय किंमत :
भारतात LG Ultra PC 16U70Q ची किंमत 949 युरो म्हणजेच अंदाजे 76,000 रुपये आहे. तर LG Ultra PC 14U70Q ची किंमत 1,049 युरो म्हणजेच अंदाजे 84,000 रुपये आहे. या लॅपटॉपमध्ये सिक्योरिटीचीही काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये फेस लॉगिन आणि फिंगरप्रिंट सेन्सरची सुविधा देण्यात आली आहे. LG Ultra PC 16U70Q चे वजन सुमारे 1.6 Kg आहे तर LG Ultra PC 14U70Q चे वजन सुमारे 1.2 Kg आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile