भारतामध्ये LG ने आपल्या पोर्टेबल लॅपटॉप LG ग्राम 14 लाँच केला. ह्याला आपण एक्लक्लूसिव्हली ई-कॉमर्स कंपनी पेटीएमद्वारा खरेदी करु शकता. अल्ट्रा सिम असलेल्या ह्या लॅपटॉपला सर्वात आधी 2016 मध्ये लाँच केले गेले होते. तथापि, काही काळानंतर आपण ह्याला LG च्या स्टोर्स आणि दुस-या रिटेलर शॉपवरुन खरेदी करु शकाल.
ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 14 इंचाची पुर्ण HD स्क्रीन दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन (1920x1080p) आहे. हा लॅपटॉप कार्बन मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम अलॉय बॉडीने बनला आहे, ज्याचे वजन केवळ 980 ग्रॅम आहे. ह्यात 2.3GHz सह इंटेल कोर i5 6200 प्रोसेसर दिले गेले आहे.
हेदेखील पाहा- Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू
हा लॅपटॉप 2 व्हर्जनमध्ये लाँच केला गेला आहे, ज्यातील पहिल्यात 4GB रॅम आणि 128GB चे अंतर्गत स्टोरेज तर दुस-यात 8GB रॅम आणि 265GB चे अंतर्गत स्टोरेज येते. ह्यात स्टीरियो स्पीकर, चांगल्या ऑडियोसाठी सायपस लॉजिक डेट आणि एक मायक्रोफोन इनबिल्ट आहे. त्याशिवाय ह्यात ब्लूटुथ, ड्यूल-बँड, Wi-fi, USB पोर्ट सारखे अनेक कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले गेले आहे.
LG ग्राम 14 च्या 4GB रॅम/128GB स्टोरेज ब्लॅक कलर वेरियंटची किंमत ७९,९९० रुपये आणि 8GB रॅम/256GB स्टोरेज गोल्ड कवर वेरियंटची किंमत ९४,९९९ रुपये आहे. गोल्ड कलर वेरियंटचा लॅपटॉप पेटीएमवर ८४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करु शकता. त्याशिवाय पेटीएमवर ८००० रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा सुद्धा मिळत आहे.
हेदेखील वाचा- जगातील पहिला क्लाउड स्टोरेज स्मार्टफोन अखेर लाँच, किंमत १९,९९९ रुपये
हेदेखील वाचा –फ्लिपकार्टवर मिळत आहे स्मार्टफोन्स, लॅपटॉप्स आणि इतर गॅजेट्सवर भारी सूट