लेनोवो Y700 गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच, किंमत ९९,९९० रुपये
ह्यासोबतच कंपनी यूजर्सला १२,९९९ रुपयाच्या किंमतीतील गेमिंग एक्सेसरिज केवळ २,४९९ रुपयात देत आहे.
लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन गेमिंग लॅपटॉप Y700 लाँच केला आहे. कंपनीने भारतीय बाजारात ह्या स्मार्टफोनची किंमत ९९,९९० रुपये ठेवली आहे आणि हा खूपच पातळ असा लॅपटॉप आहे. हा विंडोज 10 वर चालतो. ह्यात 1TB + 128GB SSD स्टोरेज आहे. हा स्टँडर्ड वॉल्ट इंटेल कोर i7 स्कायलेक CPU सह येतो. ह्यात टर्बो बूस्टसुद्धा देण्यात आला आहे.
ह्यात 4GB NVIDIA ग्राफिक्स, डॉल्बी ऑडियो JBL स्पीकर्स, एक सबवुफर आणि एक ऑप्शनल 10 – पॉईंट मल्टी-टच डिस्प्ले आणि इंटेल रियलसेंसर कॅमेरा दिला आहे, जो गेमिंगचा एक जबरदस्त अनुभव देतो. त्याचबरोबर कंपनी एक गेमिंग बॅकअप सुद्धा देत आहे.
हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)
ह्या सोबत मिळणा-या स्पेशल ऑफरमध्ये लॅपटॉपसह १२,९९९ रुपयाच्या किंमतीतील गेमिंग एक्सेसरिज केवळ २,४९९ रुपयात देत आहे. ह्यात एक लेनोवो Y गेमिंग सराउंड साउंड हेडसेट, लेनोवो Y गेमिंग प्रिसिशन माउस आणि लेनोवो Y गेमिंग मॅकेनिकल स्विच किबोर्डचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा – ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच