लेनोवो ने MWC 2018 मध्ये Yoga 730 आणि Yoga 530 केले सादर
अॅलेक्सा इंटीग्रेशन सह येतील Yoga 730 आणि Yoga 530.
लेनोवो ने या वर्षी MWC मध्ये कोणताही मोबाईल लॉन्च नाही केला, पण कंपनी ने काही लॅपटॉप सादर केले आहेत. लेनोवो ने MWC मध्ये Yoga 730 आणि Yoga 530 सादर केले आहेत. दोन्ही लॅपटॉप्स एप्रिल च्या आसपास लॉन्च केले जाऊ शकतात.
आधीच्या डिवाइस च्या तुलनेत दोन्ही लॅपटॉप्स च्या डिजाइन मध्ये थोडा बदल केला गेला आहे. दोन्ही नव्या डिवाइस मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे अमेजॉन अॅलेक्सा चा समावेश. दोन्ही लॅपटॉप माइक्रोफोन तसेच आहेत जसे आम्ही Yoga 920 मध्ये बघितले होते.
लेनोवो Yoga 720 प्रमाणे, लेनोवो Yoga 730 ला 13 इंच आणि 15 इंचाच्या फॉर्म फॅक्टर मध्ये लॉन्च केले जाईल. 16GB रॅम सह 8th जेनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर असण्याचा अंदाज लावला जात आहे. 13 इंचाच्या मॉडल मध्ये SSD स्टोरेज 512GB आणि 15 इंचाच्या मॉडल मध्ये 1TB स्टोरेज असण्याची आशा आहे.
मोठा मॉडल NVIDIA GeForce GTX 1050 GPU सह उपलब्ध होईल. 1080p किंवा 4K रिजॉल्यूशन डिस्प्ले चा विकल्प पण असू शकतो, जो लेनोवो च्या अॅक्टिव पेन 2 स्टाइलस सह येईल. 15 इंचाच्या मॉडल चे वजन 1.89kg आणि 13 इंचाच्या मॉडल चे वजन 1.2kgs असू शकते. सुरवाती किंमत $549(जवळपास 58,230 रुपये) असू शकते.
लेनोवो ने Yoga 730 सह Yoga 530 (फ्लेक्स 14) ची पण घोषणा केली. लेनोवो Yoga 530 लॅपटॉप 8th जेनरेशन इंटेल कोर i7 प्रोसेसर, 16GB DDR4 रॅम आणि 512GB SSD स्टोरेज से सह येऊ शकतो. यात 14 इंचाचा IPS LCD डिस्प्ले असू शकतो, हा 10 तासाची बॅटरी लाइफ देईल असा दावा करण्यात आला आहे. याचे वजन 1.6kgs असेल, सुरवाती किंमत $ 549 (जवळपास 35,550 रुपये) असेल.