लावा टू इन वन ट्विनपॅड:विंडोज 10 ने सुसज्ज आहे लावाचा हा ट्विनपॅड
ह्यात १०.१ इंचाची WXGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280x800 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसमध्ये दोन्ही बाजूला स्क्रीन आहे, ज्याला गरजेनुसार पुढे-मागे केले जाऊ शकते.
मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी लावाने बाजारात आपला नवीन टू-इन-वन लॅपटॉप टॅबलेट ट्विनपॅड सादर केला आहे. कंपनीने ह्याची किंमत १५,९९९ रुपये ठेवली आहे. विंडोज १० वर चालणारा डिवाइस सिंगल सिम सपोर्ट आहे. ट्विनपॅड देशभरात रिटेल स्टोर, मल्टी ब्रँड आउटलेट आणि ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर उपलब्ध होईल.
ह्याच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १०.१ इंचाची WXGA IPS डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1280×800 पिक्सेल आहे. ह्या डिवाइसमध्ये दोन्ही बाजूला स्क्रीन आहे, ज्याला गरजेनुसार पुढे-मागे केले जाऊ शकते. ह्या टू-इन-वन टॅबलेटमध्ये अटॅच करण्यासाठी वेगळा असा कीबोर्ड आणि स्टायलस एकत्र येतो.
लावा ट्विनपॅडमध्ये 1.3GHz क्वाड-कोर इंटेल प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे. हा डिवाइस 32GB च्या अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे, ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. ह्यात 2 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात 7400mAhची बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्या हायब्रिड टॅबलेटमध्ये 3G, वायफाय, GPS, ब्लूटुथ V4.0 आणि दोन मायक्रो-USB स्लॉट देण्यात आले आहे. हा चंदेरी रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – LG G5 : 4GB रॅमने सुसज्ज असलेला हा स्मार्टफोन लवरकच होणार भारतात लाँच
हेदेखील वाचा – फेसबुकने लाँच केला आपला नवीन इमोशन ऑप्शन