रिलायन्स Jio चा पहिला लॅपटॉप जिओ बुकची भारतात विक्री सुरू झाली आहे. जिओ बुक आता रिलायन्स डिजिटलच्या स्टोअरमधून खरेदी करता येईल. Jio Book साईटवर 15,799 रुपयांच्या किमतीत सूचीबद्ध आहे आणि त्यासोबत अनेक ऑफर्सही मिळत आहेत. जिओ बुकची पहिली झलक या महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 मध्ये दिसली. यापूर्वी जिओ बुक 19,500 रुपयांच्या किंमतीसह सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) वर सूचीबद्ध होते.
हे सुद्धा वाचा : फक्त एक रिचार्ज आणि वर्षभर टेन्शन फ्री! BSNL च्या 'या' रिचार्जसह 365 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा
Jio Book सह, काही बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 5,000 रुपयांची झटपट सूट उपलब्ध आहे. जिओ बुकची MRP 35,605 रुपये आहे, तर ते 15,799 रुपयांमध्ये विक्रीसाठी सूचीबद्ध आहे. Jio Book वर 1 वर्षाची वॉरंटी मिळणार आहे.
Jio Book ची बॉडी प्लास्टिकची असून त्यात 4G सपोर्ट देण्यात आला आहे. Jio Book मध्ये 11.6-इंच लांबीचा डिस्प्ले आहे आणि त्याची बॅटरी 13 तासांची आहे. जिओ बुकमध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर स्मार्टफोनमध्येही दिसतो. Adreno 610 GPU जिओ बुकमध्ये ग्राफिक्ससाठी उपलब्ध आहे आणि त्याची कमाल क्लॉक स्पीड 2.0GHz आहे.
व्हिडिओ कॉलिंगसाठी जिओ बुकमध्ये HD कॅमेरा उपलब्ध आहे. जिओ बुकमध्ये मायक्रोसॉफ्ट ऍड ब्राउझर प्री-इंस्टॉल केले जाईल. याशिवाय कॅमेऱ्यासाठी शॉर्टकट बारही असेल. जिओचे ब्रँडिंग जिओ बुकच्या मागील पॅनलवर आहे. काही प्री-इंस्टॉल केलेले Jio ऍप्स देखील Jio Book मध्ये उपलब्ध असतील. यात Jio Cloud PC चा सपोर्टही आहे.
Jio Book ला जिओ ऑपरेटिंग सिस्टमचा सपोर्ट आहे. यामध्ये 32 GB स्टोरेजसह 2 GB रॅम आहे. पहिल्या नजरेत Jio Book Chromebook सारखे दिसते. कीबोर्डमधील विंडोज बटणवर Jio लिहिलेले असले तरी त्याच्यासोबत विंडोज कीबोर्ड उपलब्ध आहे.