रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत AGM 2022 मध्ये Jio 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. दिवाळीमध्ये कंपनी भारतात 5G सेवा सुरू करणार आहे. AGM 2022 मध्ये, कंपनीने एकाच वेळी अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यात Jio कडील आगामी लॅपटॉप JioBook चा समावेश आहे. कंपनी लवकरच हा लॅपटॉप लाँच करू शक्यता आहे.
हे सुद्धा वाचा : Brahmastra Cast fees: आलिया भट्ट ते रणबीर कपूर, जाणून घ्या 'ब्रह्मास्त्र' स्टार कास्टची फी
लॉन्च होण्यापूर्वीच या लॅपटॉपचे अनेक स्पेसिफिकेशन्स लीक होत आहेत. असे सांगितले जात आहे की, हा लॅपटॉप 30,000 रुपयांच्या किमतीत दिला जाऊ शकतो. JioBook लॅपटॉपसह, कंपनी 5G कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोन देखील लाँच करण्याचा विचार करत आहे.
JioBook लॅपटॉप ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्ड्स आणि बेंचमार्क साइट गीकबेंचच्या वेबसाइटवर देखील पाहिला गेला आहे. लीक्सनुसार, लॅपटॉप प्लास्टिक बॉडीसह ऑफर केला जाऊ शकतो. या लॅपटॉपचा एक व्हिडिओही लीक झाला होता, ज्यामध्ये लॅपटॉपच्या मागील पॅनलमध्ये JIO चा लोगोही दाखवण्यात आला होता.
JioBook च्या संभाव्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, या लॅपटॉपमध्ये 1366×768 पिक्सेल रिझोल्यूशनचा डिस्प्ले मिळणार आहे. लॅपटॉपमध्ये क्वालकॉम प्रोसेसरसह 64 GB पर्यंत eMMC 5.1 स्टोरेज आणि 4 GB पर्यंत LPDDR4X रॅम मिळू शकतो. हा लॅपटॉप अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम आणि विंडोज 10 सह येऊ शकतो. त्याबरोबरच कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपला HDMI पोर्ट, ड्युअल बँड Wi-Fi आणि ब्लूटूथचा सपोर्ट मिळू शकतो.