देशात सर्वात टॉपच्या टेलिकॉम कंपनीने दूरसंचार उद्योगात खळबळ माजवल्यानंतर आता रिलायन्स Jio लॅपटॉप उद्योगातही आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, काही महिन्यांपूर्वी JioBook लाँच केला. आता मुकेश अंबानींची कंपनी Jio एक नवीन लॅपटॉप लाँच करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे नाव ‘Jio Cloud Laptop’ असणार आहे.
खरं तर, हे एक नवीन तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे महागडे लॅपटॉप स्वस्तात बनवता येतील. लक्षात घ्या की, Jio क्लाउड लॅपटॉपबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण, हा लॅपटॉप पुढील वर्षी 2024 पर्यंत लाँच केला जाऊ शकतो, असा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.
खरं तर, लॅपटॉप तयार करण्यासाठी, चिपसेट, स्टोरेज आणि इतर हार्डवेअर भाग आवश्यक असतात. परंतु Cloud तंत्रज्ञानामध्ये व्हर्च्युअल स्टोरेज आणि इतर सपोर्ट देण्यात येतो. यामुळे कोणतेही प्रोडक्ट बनवण्याचा खर्च कमी होतो. लक्षात घ्या की, या टेक्नॉलॉजीमध्ये दूरस्थपणे फीचर्स ऍक्सेस करता येतात. त्यामुळे अशा प्रोडक्टसची किंमतही कमी असते. महत्त्वाचे म्हणजे, अशी उपकरणे सबस्क्रिप्शन मॉडेलसह येतात.
Jio Cloud लॅपटॉप 15,000 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. Jio च्या 15,000 रुपयांच्या लॅपटॉपमध्ये 50,000 रुपयांच्या लॅपटॉपचे फिचर आणि अनुभव मिळेल, असा दावा केला जात आहे.
रिलायन्स Jio काही महिन्यांत लॅपटॉप भारतीय बाजारपेठेत आणण्यासाठी HP, Acer, Lenovo इत्यादी शीर्ष हार्डवेअर उत्पादकांशी चर्चा करत आहे, असे देखील म्हटले जात आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.