विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा InFocus Buddy नोटबुक लाँच

Updated on 07-Jun-2016
HIGHLIGHTS

ह्या नोटबुकमध्ये 2.6GHz इंटेल सेलेरॉन प्रोसेसर आणि 2GB ची DDR3L रॅम दिली आहे. ह्या डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज दिले आहे.

स्नॅपडिलवर खरेदी करा इनफोकस बडी नोटबुक १४,९९९ रुपयात

InFocus ने बाजारात आपला नवीन नोटबुक Buddy लाँच केला आहे. कंपनीने ह्या नोटबुकची किंमत १४,९९९ रुपये ठेवली आहे. विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा InFocus Buddy नोटबुक गोल्ड आणि सिल्वर रंगात सेलसाठी उपलब्ध आहे. ह्याला ऑनलाइन शॉपिंग साइट स्नॅपडिलवर खरेदी केले जाऊ शकते.

ह्या नोटबुकमध्ये 13.3 इंचाची HD डिस्प्ले देण्यात आली आहे. ही डिस्प्ले eDP ला सपोर्ट करते. ह्यात 2.6GHz इंटेल सेलेरॉन प्रोसेसर आणि 2GB ची DDR3L रॅम दिली आहे. ह्या डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे. ज्याला मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 256GB पर्यंत वाढवू शकतो.

हेदेखील वाचा – नेक्स्टबिट रॉबिन प्रतिक्रिया


हा नोटबुक 18mm इतका जाड आहे आणि ह्याचे वजन 1.6किलो आहे. ह्यात एक HDMI पोर्टसुद्धा देण्यात आले आहे आणि ह्यात दोन USB 3.0 पोर्ट्ससुद्धा देण्यात आले आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या नोटबुकची बॅटरी ८ तासांपर्यंत HD व्हिडियो चालवू शकते.

 

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :