Infinix ने भारतात लॅपटॉपची Zero Book Series सादर केली आहे. या लाइनअपमध्ये दोन मॉडेल Infinix Zero Book आणि Zero Book Ultra लॉन्च करण्यात आले आहेत. झिरो बुक अल्ट्रा पावरफुल प्रोसेसरने सुसज्ज आहे. यामध्ये i9 CPU सपोर्ट करण्यात आला आहे. झिरो बुक सीरिजची सुरुवातीची किंमत 49,990 रुपये आहे.
हे सुद्धा वाचा : प्रीपेडपेक्षा स्वस्त आहेत 'या' कंपन्यांचे पोस्टपेड प्लॅन्स, 199 रुपयांमध्ये चालेल संपूर्ण महिना
Infinix Zero Book सिरीजमध्ये 15.6-इंच लांबीचा फुल HD IPS डिस्प्ले आहे, जो LED बॅकलिट डिस्प्ले आहे. 12व्या जनरेशनमधील Core i5 आणि Core i7 चा पर्याय Infinix Zero Book वर उपलब्ध आहे. Infinix Zero Book Ultra 12th Generation Intel Core i9 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. Infinix Zero Book 16 GB पर्यंत RAM सह 512 GB पर्यंत NVMe PCIe 4.0 SSD स्टोरेज आणि झीरो बुक अल्ट्रा 32 GB पर्यंत LPDDR5 रॅमसह येतो. तसेच, यासह 1 TB पर्यंत NVMe PCIe 4.0 SSD स्टोरेज उपलब्ध आहे. लॅपटॉपमध्ये फुल HD वेबकॅम आहे, जो AI ब्युटी कॅम, फेस ट्रॅकिंग आणि बॅकग्राउंड ब्लरसह येतो.
Infinix Zero Book सिरीजमध्ये Windows 11 Homeचा सपोर्ट करण्यात आला आहे. झिरो बुक सिरीजमधील नोटबुक्स एज ग्लास टचपॅड आणि फुल साइज बॅकलिट चिक्लेट कीबोर्डसह येतात. लॅपटॉपसह पॉवर बटणामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देखील उपलब्ध आहे.
तसेच, लॅपटॉपमध्ये दोन AI नॉइझ कॅन्सलेशन मायक्रोफोन आणि DTS ऑडिओ प्रोसेसिंगसह 4 स्पीकर्ससाठी समर्थन आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये USB-C, दोन USB 3.0 पोर्ट, 1 x HDMI 1.4 पोर्ट, एक microSD कार्ड स्लॉट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. Infinix Zero Book मालिकेत 70 Wh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 96W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.