Infinix ने भारतात आपला नवीन लॅपटॉप – Infinix Inbook X1 Neo लाँच केला आहे. कंपनीचा हा नवीन लॅपटॉप खास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आला आहे. हा लॅपटॉप 8 GB LPDDR4x RAM आणि 256 GB SSD स्टोरेजने सुसज्ज आहे. ऍल्युमिनियम अलॉय मेटल फिनिश आणि 14-इंच डिस्प्लेसह नवीनतम Infinix लॅपटॉपची किंमत 24,990 रुपये आहे. त्याची विक्री 21 जुलैपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल.
हे सुद्धा वाचा : Amazon Prime Day Sale मध्ये iPhone 13 आणि इतर मॉडेल्स 20,000 रुपयांच्या सवलतीत उपलब्ध असतील, वाचा सविस्तर
लॅपटॉपमध्ये 1080×1920 पिक्सेल रिझोल्यूशनसह 14-इंच फुल HD + IPS डिस्प्ले आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 300 निट्स आहे. लॅपटॉप 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB SSD स्टोरेजसह येतो. हा लॅपटॉप इंटिग्रेटेड इंटेल UHD ग्राफिक्ससह येतो आणि प्रोसेसर म्हणून कंपनी त्यात क्वाड-कोर Celeron N5100 देत आहे.
Infinix चा हा लॅपटॉप Windows 11 Home OS वर काम करतो. तुम्हाला यात 50Wh बॅटरी मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बॅटरी USB Type-C पोर्ट आणि 45W AC अडॅप्टरच्या मदतीने फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. असा दावा केला जात आहे की, ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 11 तास चालते.
1.24KG वजनाच्या या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी दोन USB 3.0 पोर्ट, दोन USB Type-C पोर्ट आणि एक HDMI 1.4 पोर्ट आहे. वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये Wi-Fi सह ब्लूटूथ 5.1 देण्यात येत आहे. कंपनीचा हा नवीन लॅपटॉप HD वेबकॅमने सुसज्ज आहे. याशिवाय, तुम्हाला दोन मायक्रोफोनसह DTS ऑडिओ देखील मिळेल.