आयबॉलने भारतात आपल्या लॅपटॉपची कॉम्पबुक सीरिज लाँच केली आहे. हे लॅपटॉप दोन नवीन प्रकारत एक्सलेंस आणि एक्सेमप्लेरमध्ये उपलब्ध आहे, ज्याची किंमत ९,९९९ रुपये आणि १३,९९९ रुपये आहे. आयबॉल कॉम्पबुक एक्सलेंस ११.६ इंचाच्या डिस्प्लेसह येतो. दोन्ही लॅपटॉप्समध्ये 1366×768 ची पिक्सेल रिझोल्युशन आणि 1.83 GHz इंटेल अॅटम-कोर प्रोसेसरसह 2GB रॅम आहे. डिवाइसमध्ये 32GB चे अंतर्गत स्टोरेज देण्यात आले आहे, ज्याला आपण मायक्रो-एसडी कार्डच्या साहाय्याने 64GB पर्यंत वाढवू शकतो. त्याचबरोबर ह्याच आपल्याला विंडोज १० आधीपासूनच इन्स्टॉल केलेला मिळेल. ह्यात 10,000mAh ची बॅटरी दिली गेली आहे आणि कंपनीनुसार ही ८.५ तासांचा व्हिडियो प्लेबॅक देतो.
यूजर्ससह सप्लीमेंट्रीसुद्धा खरेदी करु शकता. ह्यात आपल्याला इंश्युरन्स पॅकसुद्धा मिळत आहे, जो अपघाती नुकसान, चोरी झाल्यास, ब्रेकएजला कवर करतो. त्याचबरोबर १ वर्षाची वॉरंटीसुद्धा मिळत आहे. ह्या लॅपटॉपला बिजनेसमॅनसुद्धा खरेदी करु शकता. ज्यात अनेक फिचर्स आहेत जसे सिक्युअर बूस्ट, डोमे जॉईन, बिट लॉकर, रिमोट डेस्कटॉप सारखे अनेक फीचर्स आहेत. ह्या व्हर्जनची किंमत १९,९९९ रुपयांपासून सुरु होते.
हेदेखील पाहा – हे आकर्षक स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच
मागील आठवड्यात मायक्रोमॅक्सने कॅनवास लॅपबुक L1160 १०,४९९ रुपयाच्या किंमतीत लाँच केला होता. हा डिवाइस 11.6 इंचाच्या डिस्प्लेसह 1.83GHz इंटेल क्वाड-कोर प्रोसेसर, 2GB रॅमसह येतो. ह्या लॅपटॉपमध्ये 4100mAh ची बॅटरी दिली आहे.
हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला मिजू M3 नोट, किंमत ९,९९९ रुपये
हेदेखील वाचा – लवकरच आपल्याला मिळणार “मेड इन इंडिया” आयफोन्स?