HP ने भारतात लाँच केला जगातील सर्वात पातळ लॅपटॉप, किंमत १.२ लाख

HP ने भारतात लाँच केला जगातील सर्वात पातळ लॅपटॉप, किंमत १.२ लाख
HIGHLIGHTS

Hp spectre 13 लॅपटॉप 10.4mm थोडा पातळ आहे आणि ह्याचे वजन केवळ १.११ किलो आहे.

लॅपटॉप निर्माता कंपनी HP ने भारतात आपला नवीन लॅपटॉप Spectre 12 लाँच केला. हा मागील वर्षी लाँच झालेल्या Spectre 13 चा अपग्रेडेड व्हर्जन आहे आणि हा जगातील सर्वात पातळ लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल आणि ह्याची किंमत १.२ लाखांपासून सुरु होईल. हे सर्व HP स्टोर्स आणि चॅनल पार्टनर्सच्या माध्यमातून जुलैपासून उपलब्ध होईल.

 

ह्याचा आकार 13 इंच आहे आणि हा एक अल्ट्राबुक आहे. ह्यात इंटेल कोर i5 आणि i7 प्रोसेसरसुद्धा असेल. त्याचबरोबर ह्यात 8GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्यात आपल्याला स्टोरेज पर्यायसुद्धा मिळत आहे. इंटेल कोर i5 व्हर्जनमध्ये यूजरला 256GB PCle आधारित SSD मिळते. तर i7 व्हर्जनमध्ये आपल्याला 512GB PCle आधारित स्टोरेज मिळते. डिस्प्ले विषयी बोलायचे झाले तर, ह्याच्या दोन्ही व्हर्जनमध्ये 13.3 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1080 पिक्सेल आहे. हा एक टच डिस्प्ले नाही. ही डिस्प्ले गोरिला ग्लासने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – ७००० रुपयांच्या किंमतीत येणारे ५ उत्कृष्ट स्मार्टफोन्स
 

ह्या लॅपटॉपला कार्बन फायबर आणि अॅल्युमिनियमने बनवले आहे. ह्यात आयलँड स्टाइल किबोर्ड दिला आहे. हा किबोर्ड बॅकलिट आहे आणि ह्या लॅपटॉपमध्ये ग्लास टचपॅडसुद्धा आहे. हा HP ची इमेजपॅड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ह्यात 2USB 3.1 पोर्ट आहे. लॅपटॉपमध्ये 4 सेलची बॅटरी दिली आहे आणि ह्याचे वजन 1.11 किलोग्रॅम आहे.

हेदेखील वाचा – अल्टीमेट ईयर्स UE बूम 2 स्पीकर लाँच, किंमत १५,९९५ रुपये
हेदेखील वाचा – 
HTC डिझायर 630 स्मार्टफोन भारतात झाला विक्रीसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo