कम्प्युटर गेमिंग प्रेमींसाठी HP ने दोन उत्कृष्ट गेमिंग लॅपटॉप बाजारात आणले आहेत. HP Omen 16 (2022) आणि Victus 15 (2022) असे दोन नवीन लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. या लॅपटॉप्समध्ये, कंपनी आधीपेक्षा अधिक चांगल्या कूलिंग सिस्टमसह इंटेल आणि AMDचे नवीन प्रोसेसर ऑफर करत आहे. HPने नुकतेच हे लॅपटॉप अमेरिकेत लॉन्च केले आहेत.
US मध्ये HP Omen 16 (2022) ची सुरुवातीची किंमत $1199.99 (सुमारे 93,200 रुपये) आहे. तसेच, कंपनीने HP Victus 15 (2022) देखील लाँच केले आहे, ज्याची प्रारंभिक किंमत $ 799.99 (सुमारे 62,200 रुपये) आहे. दोन्ही गेमिंग लॅपटॉपची विक्री येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. या लॅपटॉप्समध्ये, कंपनी परफॉर्मन्स मोड, नेटवर्क बूस्टर आणि सिस्टम व्हाइटल्ससह अनेक उत्तम गेमिंग वैशिष्ट्ये ऑफर करत आहे.
या लॅपटॉपमध्ये कंपनी 2560×1440 पिक्सेल रिझोल्यूशनसह 16.1-इंच लांबीचा QHD IPS डिस्प्ले देत आहे, जो 165Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा लॅपटॉप दोन प्रोसेसर पर्यायांसह येतो – Intel Core i9-12900H आणि AMD Ryzen 9 6900HX प्रोसेसर. इंटेल प्रोसेसर असलेल्या मॉडेलमध्ये कंपनी Nvidoa GeForce RTX 3070 Ti ग्राफिक्स कार्ड देखील ऑफर करत देत आहे.
त्याबरोबरच, AMD प्रोसेसर असलेल्या व्हर्जनमध्ये ग्राफिक्स आणि AMD Ryzen RX 6650M कार्डसाठी Max-Q तंत्रज्ञान आहे. हा लॅपटॉप 32GB पर्यंत DDR5 4800MHz RAM आणि 2TB पर्यंत PCIe Gen4x4 SSD ने सुसज्ज आहे. हा गेमिंग लॅपटॉप अतिशय मजबूत बॅटरीसह येतो, जो सिंगल चार्जवर 9 तासांचा बॅकअप देतो.
या लॅपटॉपमध्ये 1920×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 15.6-इंच लांबीचा IPS डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनीने हा लॅपटॉप 16GB पर्यंत DDR4 3200MHz RAM आणि 1TB पर्यंत PCIe SSD सह लॉन्च केला आहे. ग्राफिक्ससाठी, त्याच्या इंटेल आवृत्तीमध्ये Nvidia GeForce RTX 3050 Ti GPU आणि AMD प्रोसेसर असलेल्या मॉडेलमध्ये AMD Radeon RX 6500M ग्राफिक्स कार्ड दिला आहे. शिवाय, या गेमिंग लॅपटॉपचे वजन 2.3 किलो आहे.