HP चा हा नोटबुक आहे आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका नोटबुक

Updated on 03-Jun-2016
HIGHLIGHTS

HP ईलाइटबुक फॉलिओची किंमत १,२८,००० रुपये आहे, तर ईलाइट X2 1012 नोटबुक्ची किंमत ९५,००० रुपये आहे.

HP ने भारतीय बाजारात आपले दोन नवीन नोटबुक्स ईलाइटबुक फॉलिओ आणि ईलाइट X2 1012 लाँच केले. ईलाइटबुक फॉलिओ एक खूप पातळ आणि वजनाने हलका असलेला नोटबुक आहे. तर ईलाइट X2 1012 एका टॅबलटेप्रमाणे काम करतो.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग
 

HP ईलाइटबुक फॉलिओची किंमत १,२८,००० रुपयांपासून सुरु होते, तर ईलाइट X2 1012 नोटबुक्सची किंमत ९५,००० रुपयांपासून सुरु होते. HP ईलाइटबुक फॉलिओचे वजन 1 किलो आहे.

ईलाइट X2 1012 नोटबुक्स अॅल्युमिनियमने बनलेला आहे. ह्याची जाडी 8.1mm आहे. ह्याचे वजन 840 ग्रॅम आहे आणि ह्यात एक बिल्ट-इन किकस्टँडसुद्धा दिला गेला आहे.
 

हेदेखील वाचा – आज केवळ १ रुपयात मिळणार वनप्लस 3 चा VR हेडसेट
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :