HP ने बाजारात आपला नवीन लॅपटॉप क्रोमबुक 13 G1 लाँच केला आहे. कंपनीने आपल्या लॅपटॉपची किंमत ४९९ डॉलर ठेवण्यात आली आहे. सध्यातरी ह्या लॅपटॉपला कंपनीच्या अमेरिकेच्या वेबसाइटवर लिस्ट केले गेेले आहे. ह्या खरेदी केल्यावर ग्राहकांना HP एलीन USB-C डॉकिंग स्टेशन, HP स्लिम अल्ट्राबुक प्रोफेशनल टॉप लोड केस, USB टाइप-C टू HDMI अॅडॅप्टर, USB टाइप-C टू VGA अॅडॅप्टर आणि DP अॅडॅप्टर मोफत मिळतील.
हा लॅपटॉप मेटल बॉडीने बनला आहे. हा लॅपटॉप USB टाइप-C पोर्टला सपोर्ट करतो. लॅपटॉपटे परिमाण 319.9×219.6×12.9mm आणि वजन १.२९ ग्रॅम आहे. ह्या डिवाइसमध्ये 13.3 इंचाची पुर्ण HD अँटी ग्लेयर डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1080×1920 पिक्सेल आहे. त्याशिवाय ह्यात (1800×3200 पिक्सेल) रिझोल्युशनची QHD+डिस्प्लेचा पर्यायसुद्धा मिळत आहे. हा डिवाइस क्रोम ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. ह्यात 16GB LPDDR3 1866 मेगाहर्ट्ज रॅम आहे. ग्राफिक्ससाठी इंटेल HD 515 GPU आहे. हा लॅपटॉप 6th जेन इंटेल कोर M प्रोसेसर (कोर M3, कोर M5, कोर M7) किंवा इंटेल पेंटियम 4405Y प्रोसेसरने सुसज्ज आहे.
हेदेखील वाचा – ६००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – “Make for India” च्या अंतर्गत सॅमसंग केवळ १ रुपयात देत आहे हे स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – LG ने लाँच केला असा फिंगरप्रिंट सेंसर जो येईल स्मार्टफोन डिस्प्लेच्या आत