मोठ्या कालावधीनंतर Honor ने भारतीय बाजारात दोन नवे लॅपटॉप लाँच केले आहेत. कंपनीने Honor MagicBook X14 (2023) आणि Honor MagicBook X16 (2023) हे दोन नवे लॅपटॉप लाँच केले. Honor चे हे दोन्ही लॅपटॉप Intel 12th Generation प्रोसेसर आणि दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये येतील. चला तर मग जाणून घेऊयात दोन्ही लॅपटॉपची किमंत आणि स्पेक्स –
Honor MagicBook X14 (2023) च्या 512GB स्टोरेजसह 8GB रॅमची किंमत 48,990 रुपये आहे. तर 16GB रॅमसह 512GB स्टोरेजची किंमत 51,990 रुपये आहे.
Honor MagicBook X16 (2023) च्या 8GB RAMसह 512GB स्टोरेजची किमंत 50,990 रुपये आहे. 16GB रॅमसह 512GB स्टोरेजची किमंत 53,990 रुपये आहे. दोन्ही लॅपटॉप Amazon India वरून खरेदी करता येतील.
Honor MagicBook X14 (2023) मध्ये 14-इंच लांबीचा फुल HD+ IPS डिस्प्ले आहे. Honor MagicBook X16 (2023) मध्ये 89 च्या स्क्रीन-टू-बॉडी रेशोसह 16-इंच लांबीचा फुल HD+ IPS डिस्प्ले आहे. या दोन्ही लॅपटॉपमध्ये Intel चा 12th Generation Core i5-12450H प्रोसेसर आहे. लॅपटॉपमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे. ऑनरच्या या दोन्ही लॅपटॉपसोबत मेटल बॉडी उपलब्ध आहे. MagicBook X14 चे वजन 1.43 kg आणि MagicBook X16 चे वजन 1.75 kg आहे.
त्याबरोबरच, या लॅपटॉपमध्ये 16GB पर्यंत LPDDR4X RAM सह 512GB पर्यंत SSD स्टोरेज आहे जे 1TB पर्यंत वाढवता येईल. याव्यतिरिक्त, या दोन्ही लॅपटॉपमध्ये 65W टाइप-C पोर्ट चार्जिंग हॅशसह 60Whr बॅटरी आहे. दोन्हीमध्ये वेबकॅम, 2 USB टाइप-A पोर्ट, एक HDMI आणि USB टाइप-C पोर्ट आहे.