Important Tips: लॅपटॉपचा Wi-Fi पासवर्ड विसरलात? ‘या’ सोप्या पद्धतीने करा रिकव्हर, बघा प्रक्रिया  

Important Tips: लॅपटॉपचा Wi-Fi पासवर्ड विसरलात? ‘या’ सोप्या पद्धतीने करा रिकव्हर, बघा प्रक्रिया  
HIGHLIGHTS

लॅपटॉपचा Wi-Fi पासवर्ड पासवर्ड लक्षात येत नाहीये?

काळजी करू नका, तुम्ही Wi-Fi पासवर्ड सहज रिकव्हर करू शकता.

लॅपटॉपमध्ये आधीच कनेक्ट केलेल्या Wi-Fi चा पासवर्ड कसा काढायचा? जाणून घ्या प्रक्रिया

लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम प्रणाली सुरु झाली. तेव्हापासून प्रत्येक जण आपल्या कामासाठी घरात किंवा कार्यालयात Wi-Fi ची सुविधा नक्कीच करतो. आपण सर्वांना माहितीच आहे की, सहसा ऑफिसचा किंवा घरातील Wi-Fi चा पासवर्ड बदलत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे पासवर्ड न बदलल्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्याची फार गरज वाटत नाही. अशा परिस्थितीत, आपण Wi-Fi पासवर्ड विसरतो.

Also Read: How to: इंटरनेटशिवाय Google Maps वर ऑफलाइन मार्ग पहा, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Wi-Fi पासवर्ड विसरलात? सोप्या पद्धतीने करा रिकव्हर

दरम्यान, लॅपटॉप फॉरमॅट झाल्यावर किंवा एखाद्या घरी आलेल्या पाहुण्याला सांगावे लागते तेव्हा पासवर्ड विसरल्याचे तुम्हाला लक्षात येते. मात्र, आता ही फार मोठी अडचण नाही. कारण तो विसरल्यानंतरही तुम्ही Wi-Fi पासवर्ड सहज शोधू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला लॅपटॉपमध्ये आधीच कनेक्ट केलेल्या Wi-Fi चा पासवर्ड कसा काढायचा ते सांगणार आहोत.

  • सर्व प्रथम कम्प्युटर Wi-Fi शी कनेक्ट करा.
  • इंटरनेटशी कनेक्ट केल्यानंतर, कंट्रोल पॅनलवर जा आणि नेटवर्क आणि शेअरिंग सेंटर ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर चेंज ॲडॉप्टर सेटिंग्ज वर क्लिक करा.
  • आता ज्या Wi-Fi नेटवर्कचा पासवर्ड तुम्ही विसरलात त्यावर राईट क्लिक करा.
  • राइट क्लिक केल्यावर तुम्हाला स्टेटस ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • यानंतर दिलेल्या Wireless Properties वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला कनेक्शन आणि सिक्योरिटी ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क सिक्युरिटीचा पर्याय दिसेल.
  • अखेर याखाली तुम्हाला Show Characters चा पर्याय मिळेल. येथे क्लिक करून तुम्ही तुमच्या Wi-Fi चा पासवर्ड सहज बघू शकता.
Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo