डेलने आपल्या नवीन सीरिजचा इंस्पिरॉन 2 इन १ आणि नोटबुक्स लाँच केले. टू इन वन लाइनअपमध्ये डेलने इंस्पिरॉन 7000, इंस्पिरॉन 11 3000 आणि इंस्पिरॉन 5000 लाँच केला आहे. कंपनीने इंस्पिरॉन 5000 नोटबुकला दोन आकारात लाँच केले आहे. ह्या सर्व प्रोडक्ट्सची किंमत २४९ डॉलरपासून सुरु होते. आता टू इन वन डिवायसेस सर्वात आधी चीन आणि अमेरिकेच्या बाजारात उपलब्ध होतील. तर कंपनीच्या साइटवर २ जूनपासून उपलब्ध होतील.
इंस्पिरॉन 7000 लॅपटॉप १३ इंच, १५ इंच आणि १७ इंच अशा तीन आकारात मिळेल. १७ इंचाची डिस्प्ले असलेला हा जगातील पहिला टू-इन-वन लॅपटॉप आहे. हा विंडोज 10 वर काम करतो. ह्यात 6th जेन इंटेल कोर i3, i5 आणि i7 प्रोसेसर मिळेल. ह्यात USB टाइप-C पोर्टसुद्धा मिळेल. ह्याची किंमत डॉलर ७४९ आहे.
इंस्पिरॉन 11 3000 टू-इन-वन मध्ये 11.6 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा डिवाइस विंडोज 10 वर काम करतो. ह्यात USB 3.0 पोर्ट देण्यात आले आहे. ह्याची किंमत २४९ डॉलर आहे.
हेदेखील वाचा – यू यूनिकॉर्न विरुद्ध शाओमी रेडमी नोट 3: कोणता स्मार्टफोन आहे सरस
तर इंस्पिरॉन 5000 2 इन वन च्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 13 इंच आणि 15 इंचाची डिस्प्ले देण्यात आली आहे. ह्या लॅपटॉपमध्ये बॅकलिट कीबोर्ड मिळत आहे. हा विंडोज 10 वर काम करतो. ह्यात 16GB चे ड्यूल चॅनल DDR4 मेमेरी देण्याता आली आहे. ह्याची किंमत 529 डॉलरपासून सुरु होते.
डेलने ह्या लॅपटॉप्ससह रेग्युलर नोटबुक्ससुद्धा लाँच केले आहेत. १५ इंच आणि १७ इंचाचा इंंस्पिरॉन 5000 नोटबुक्समध्ये 6th जेन इंटेल कोर i7 प्रोसेसर दिले गेले आहे. हा विंडोज 10 वर काम करतो. हा नोटबुक अनेक रंगात उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन