Dell ने आपला नवीन लॅपटॉप Dell XPS 13 Plus 9320 भारतीय बाजारात लाँच केला आहे. Dell XPS 13 Plus 9320 Infinity Edge डिस्प्लेसह देण्यात आला आहे. या Dell लॅपटॉपमध्ये इंटेल 12th Gen 28W प्रोसेसर आहे. ज्यात एक्सप्रेस चार्ज, आय सेफ टेक्नॉलॉजी आणि पूर्वीपेक्षा उत्तम स्पीकर मिळणार आहे. Dell ने हा लॅपटॉप CES 2022 मध्ये पहिल्यांदा लाँच केला होता.
हे सुद्धा वाचा : Whatsapp चे नवे फीचर : युजर्स स्वत: तयार करू शकतील अवतार, इतरांना पाठवण्याची सुविधाही मिळेल
Dell XPS 13 Plus 9320 मध्ये 4K रिझोल्यूशनसह 13-इंच लांबीचा फोर साईडेड इन्फिनिटी एज अल्ट्रा HD+ डिस्प्ले आहे. या लॅपटॉपमध्ये 12th Gen Intel Core 28W प्रोसेसर उपलब्ध आहे. त्याबरोबरच, लॅपटॉपमध्ये झिरो लॅक्टिक कीबोर्ड आणि कॅपेसिटिव्ह टचसह ग्लास टचपॅड देखील मिळतो. या लॅपटॉपमध्ये चार स्पीकर देखील आहेत. त्याबरोबरच, असा दावा केला जातो की बॅटरी एका तासापेक्षा कमी वेळात 80% चार्ज होईल.
हे उपकरण 12व्या जनरेशन Intel Core i7-1260P CPU, 18MB Cache आणि Intel Iris Xe ग्राफिक्सद्वारे समर्थित आहे. लॅपटॉप 5200MHz वर 16GB LPDDR5 ड्युअल चॅनल रॅम आणि 1TB M.2 Gen 4 PCIe NVMe SSD स्टोरेज पॅक करतो.
Dell XPS 13 Plus 9320 ची किंमत 1,59,990 रुपये आहे. ही किंमत 16 GB RAM आणि 512 GB मॉडेलसह ADL-P Ci5-1240P 12 core साठी आहे. तर ADL-P Ci7-1260P 12 core, 1 TB स्टोरेजसह 16 GB RAM व्हेरिएंटची किंमत 1,79,990 रुपये आहे. या डेल लॅपटॉपची विक्री 23 जुलैपासून Amazon आणि कंपनीच्या वेबसाइटवर सुरू होईल.