ह्या ऑफरच्या अंतर्गत विद्यार्थी आणि त्याच्या आई-वडिलांना केवळ १ रुपयात हा लॅपटॉप घेता येईल आणि उरलेले पैसे व्याजाशिवाय ते टप्प्याटप्प्यात देऊ शकतात.
जर आपण लॅपटॉप घेऊ इच्छिता तर कंम्प्यूटर आणि लॅपटॉप निर्माता कंपनी डेल आपल्यासाठी एक खूपच चांगली ऑफर घेऊन आली आहे. ह्या ऑफरच्या अंतर्गत डेल ने “बॅक टू स्कूल” नावाची एक नवीन योजना सुरु केली आहे. आयटी कंपनी डेलने सोमवारी ह्या योजनेची घोषणा केली.
डेलचा हा कार्यक्रम मे पर्यंत चालेल. ही ऑफर २२ मार्च ते ३१ मेपर्यंत चालेल. ह्या ऑफरच्या अंतर्गत विद्यार्थी आणि त्याच्या आई-वडिलांना केवळ १ रुपयात हा लॅपटॉप घेता येईल आणि उरलेले पैसे व्याजाशिवाय ते टप्प्याटप्प्यात देऊ शकतात. बॅक टू स्कूल ऑफर देशभरात सर्व अधिकृत डेल आउटलेट किंवा कम्प्यूइंडिया वेबसाइटवर उपलब्ध आहे. ग्राहकांना लॅपटॉप खरेदी करण्याच्या सात दिवसाच्या आत डेलचे बॅक टू स्कूल ऑफरसह रजिस्टर करणे अनिवार्य असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ह्या अभियानाअंतर्गत डेल लॅपटॉप मॉडलची रेंज उपलब्ध होईल. डेलनुसार, यूजर ऑल-इन-वन मॉडल डेल इंस्पिरॉन डेस्कटॉप किंवा इंस्पिरॉन 3000 सीरिजचा लॅपटॉप (4th gen Core i3 notebook model) एक रुपयात खरेदी करु शकाल.
लॅपटॉप खरेदी करणा-या ग्राहकांना ९९९ रुपये देऊन दोन वर्षांसाठी डेल नेक्स्ट बिजनेस डे ऑनलाइन वॉरंटी, एक वर्षासाठी एड्यूराइट कंटेंट पॅकसुद्धा मिळतील. त्याचबरोबर त्यांना एक शॉपिंग वाउचरसुद्धा मिळेल.