CES 2019: Samsung ने नवीन ग्राफिक्स कार्ड्स सह आपला Notebook Odyssey गेमिंग लॅपटॉप केला सादर

CES 2019: Samsung ने नवीन ग्राफिक्स कार्ड्स सह आपला Notebook Odyssey गेमिंग लॅपटॉप केला सादर
HIGHLIGHTS

सॅमसंग Notebook Odyssey नवीन डिजाइन सह सादर केला आहे आणि या नवीन गेमिंग लॅपटॉपचे वजन 2.4 किलोग्राम आहे.

महत्वाचे मुद्दे

  • या नवीन गेमिंग लॅपटॉप मध्ये Nvidia RTX 2080 चा केला गेल आहे समावेश
  • यात आहे नवीन पेंटा-पाइप कूलिंग सिस्टम
  • लॅपटॉप मध्ये आहे 15.6 इंचाचा फुल HD पॅनल

 

CES 2019 सुरु झाला आहे आणि हा कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो 8 जानेवारी ते 11 जानेवारी 2019 [पर्यंत चालेल. Samsung यावेळी आपल्या विचित्र दिसणाऱ्या गेमिंग लॅपटॉप सह हजार झाली आहे. सॅमसंग ने पहिल्यांदाच एखादा गेमिंग लॅपटॉप सादर केलेला नाही तर याआधी कंपनीने Odyssey मोनिकर सह आपले डिवाइसेज लॉन्च केले आहेत. Notebook Odyssey सॅमसंगचा आता पर्यंतचा सर्वात पॉवरफुल लॅपटॉप आहे.

Notebook Odyssey गेमिंग लॅपटॉपचे वजन 2.4 किलोग्राम आहे आणि हा विचित्र सेंटर हिन्ज सह सादर केला गेला आहे जो डिस्प्लेला डेस्कटॉप मॉनिटर प्रमाणे फिट करतो. हा किती काळ चालेल आणि याची डिजाइन किती स्टेबल आहे हे आता सांगता येणार नाही पण तुम्हाला यात नेहमीचे गेमिंग फीचर्स मिळत आहेत ज्यात मल्टी-कलर बॅकलिट कीबोर्ड आणि टॉप लाइन हार्डवेयर आहेत.

हार्डवेयर बद्दल बोलायचे तर, हा लॅपटॉप पॉवरफुल बनवण्यासाठी Nvidia RTX 2080 ग्राफिक्स कार्डचा मोठा हात आहे. Nvidia ने CES च्या आधीच लॅपटॉप्स साठी नवीन RTX ग्राफिक्स कार्ड्सची घोषणा केली होती. Nvidia नुसार, हे ग्राफिक्स कार्ड्स 40 लॅपटॉप्स साठी उपलब्ध होतील. कंपनीचा दावा आहे कि RTX 2080 आणि RTX 2060 दोन्हीही GTX 1080 च्या तुलनेत 20 टक्के जास्त परफॉरमेंस ऑफर करतात. हे कार्ड्स रे-ट्रेसिंगला सपोर्ट करतात, ज्यमुळे विडियो गेम्स अजूनच वास्तविक वाटतात.

लॅपटॉप मधील ग्राफिक्स खूप प्रभावशाली आहे आणि हा 8th-जनरेशन इंटेल कोर i7 CPU (वेरिएंट सांगण्यात आलेला नाही), 16GB रॅम सह पेयर केला गेला आहे तसेच दोन NVME SSDs आणि एक हार्ड ड्राइव यात देण्यात आल्या आहेत. लॅपटॉप मध्ये 15.6 इंचाचा फुल HD पॅनल, 144Hz रिफ्रेश रेट आणि Nvidia G-सिंक साठी सपोर्ट आहे. I/O साठी लॅपटॉप मध्ये तीन USB-A 3.0 पोर्ट्स, एक HDMI पोर्ट, एक ईथरनेट पोर्ट आणि एक USB-C पोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉप इतका काही बारीक किंवा हलका नाही.

रे-ट्रेसिंगला जास्त कम्प्यूटर पॉवरची गरज असते. हे कार्ड्स परफॉरमेंस साठी नवीन Max-Q टेक्नलॉजी वर आधारित आहेत आणि सॅमसंग ने हार्डवेयर थंड ठेवण्यासाठी नवीन पेंटा-पाइप कूलिंग सिस्टम दिली आहे. Notebook Odyssey मध्ये दोन फॅन्सचा वापर केला गेला आहे, प्रत्येकात 86 ब्लेड्स आहेत, ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे कि हे याला वेगवान आणि थंड ठेवतात.

सॅमसंग ने Notebook Odyssey ची किंमत सांगितली नाही आणि हा यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo