जेव्हापासून वर्क फ्रॉम होम सिस्टम सुरु झाली आहे, तेव्हापासून प्रत्येक कर्मचाऱ्याकडे उत्तम दर्जाचा लॅपटॉप असणे आवश्यक झाले आहे. ऑफिसमधील बरीच महत्त्वाची काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रीमियम लॅपटॉपची गरज असते. पण हे लॅपटॉप्स प्रत्येक कर्मचाऱ्याला परवडतील असे नाही. किंवा हे प्रत्येक कंपनी कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी लॅपटॉप देणारंच असे देखील नाही. त्यामुळे स्वतःची सोय स्वतःच करावी लागेल.
आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी त्या प्रीमियम लॅपटॉप्सची लिस्ट आणली आहे. ज्यावर मोठी बचत करता येणार आहे, कारण ते सवलतीसह उपलब्ध आहेत. या लॅपटॉप्सची परफॉर्मन्स हाय असते, त्यामुळे जवळपास सर्व सॉफ्टवेअर्स तुम्हाला आरामात चालवता येतील. पुढील लॅपटॉप तुम्हाला इ-कॉमर्स साईटद्वारे खरेदी करता येतील.
या लॅपटॉपमध्ये तुम्हाला 13.5 इंच PixelSens टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल. हा लॅपटॉप त्या ग्राहकांसाठी उपयुक्त आहे, ज्यांना गेमिंगसाठी नव्या लॅपटॉपची गरज आहे. लॅपटॉप 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB SSDस्टोरेज सह सुसज्ज आहे. तसेच, लॅपटॉप Ryzen5 चिपसेटने सुसज्ज आहे. या लॅपटॉपची किमंत 86,990 रुपये इतकी आहे.
हा लॅपटॉप 10 जनरेशन लॅपटॉप इंटेल कोअर i7- 10510U चिपसेटने सज्ज आहे. यामध्ये 15.6 इंच लांबीचा फुल HD अँटी ग्लेअर डिस्प्ले मिळेल. यामध्ये इंटेल UHD ग्राफिक्स कार्ड देखील देण्यात आला आहे. या लॅपटॉपच्या 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत खरी किंमत 2,12,999 रुपये इतकी आहे. मात्र, तुम्ही यांना 12% सवलतीसह 1,88,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.