लॉकडाऊन काळापासून वर्क फ्रॉम होम सिस्टम सुरु झाली आहे, जी अद्यापही सुरु आहे. तसेच, मुलांचे ऑनलाईन क्लासेसही होत असतात. यासाठी तुम्हाला एका उत्तम लॅपटॉपची गरज नक्कीच असते. जर तुमचा जुना लॅपटॉप आता तुम्हाला त्रास देत असेल, आणि तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. फ्लिपकार्टवरून Asus Vivobook 14 स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.
फ्लिपकार्टवर या लॅपटॉपची MRP 33,990 रुपये इतकी आहे. मात्र, यावर 35% सवलत दिली जात आहे. त्यामुळे हा लॅपटॉप 21,990 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
लॅपटॉप खरेदीसाठी EMI पर्याय देखील आहे. तुम्ही दरमहा 1,051 रुपये भरून लॅपटॉप स्वतःचा बनवू शकता. नो कॉस्ट EMI बद्दल बोलायचे झाले तर, ते दरमहा 3,665 रुपये देऊन खरेदी करता येणार आहे. बँक ऑफर्सदेखील यावर तुम्हाला मिळणार आहेत. जर तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे.
तुमचा जुना लॅपटॉप एक्सचेंज करूनही यावर भारी बचत केली जाऊ शकते. एक्सचेंज ऑफर्समध्ये तुम्हाला तब्बल 16,300 रुपयांचा ऑफ मिळणार आहे. वरील सर्व ऑफर्ससह तुम्हाला हा लॅपटॉप एखाद्या स्मार्टफोनपेक्षाही कमी किमतीत म्हणजेच फक्त 5,690 रुपयांना मिळेल.
Asus Vivobook 14 मध्ये 14-इंच लांबीचा HD डिस्प्ले आहे, हा एक अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यात सेलेरॉन ड्युअल कोअर प्रोसेसर देखील मिळणार आहे. लॅपटॉपमध्ये 4 GB रॅम आणि 256 GB SSD स्टोरेज आहे. तसेच, हे डिवाइस Windows 11 Home वर कार्य करते. लॅपटॉपचे वजन 1.60 किलो आहे. हा एक स्टायलिश, पोर्टेबल, थिन आणि हलका लॅपटॉप आहे.