आसूसच्या ह्या नवीन झेनबुक 3 लॅपटॉपमध्ये आहे 1TB SSD स्टोरेज

Updated on 30-May-2016
HIGHLIGHTS

आसूस झेनबुक 3 लॅपटॉपचे वजन 0.907 ग्रॅम आहे आणि ह्याची जाडी 11.9mm आहे.

आसूसने बाजारात आपला एक नवीन लॅपटॉप झेनबुक 3 लाँच केला आहे. हा एक नवीन लॅपटॉप मॅकबुक एअरपेक्षा पातळ आणि हलका आहे. ह्याचे वजन 0.907 ग्रॅम आहे आणि ह्याची जाडी 11.9mm आहे. आसूसने दावा केला आहे की, हा नवीन लॅपटॉप आपल्या जुन्या व्हर्जनपेक्षा तेज आहे आणि हा मॅकबुक एयरपेक्षा जास्त जलद आहे.
 

ह्या नवीन लॅपटॉपमध्ये पुर्ण अॅल्युमिनियम बॉडी दिली गेली आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्याला एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियम अलायने बनवले आहे. ह्या नवीन डिवाइसचे डिझाईन ओल्ड जनरेशन जेनबुक सारखे आहे. त्याचबरोबर कंपनीने ह्या डिवाइसला काही नवीन रंगात लाँच केले आहे. हा नवीन झेनबुक 3 रोज गोल्ड, ग्रे आणि रॉयल ब्लू रंगात मिळेल.

हेदेखील वाचा – .. तर असा होता परमाणु हत्यारांचा इतिहास आणि कार्य

ह्याचा पहिला व्हर्जन इंटेल कोर i5 प्रोसेसर आणि दुसरा व्हर्जन इंटेल कोर i7 प्रोसेसरने सुसज्ज असेल. ह्याच्या मूळ व्हर्जनमध्ये इंटेल कोर i5, 4GB रॅम आणि 256GB SSD स्टोरेज आहे. ह्याची किंमत डॉलर ९९९ (जवळपास ६७,२५० रुपये) पासून डॉलर १,९९९ (जवळपास १,३४,५५५ रुपये) पर्यंत आहे. आसूस झेनबुक 3 चा टॉप व्हर्जन इंटेल कोर i7 प्रोसेसर, 16GB रॅम आणि 1TB SSD ने सुसज्ज आहे.

हेदेखील वाचा – LYF फ्लेम 3 स्मार्टफोन लाँच, किंमत ३,९९९ रुपये
हेदेखील वाचा – जोला C स्मार्टफोन लाँच, सेलफिश ऑपरेटिंग सिस्टम 2.0 ने सुसज्ज

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech.

Connect On :