मोबाइल डिवायसेस निर्माता कंपनी आसूसने बाजारात आपला नवीन झेनबुक सीरिजचे तीन नवीन लॅपटॉप झेनबुक UX303UB, झेनबुक UX305CA आणि झेनबुक UX305UA लाँच केले. आसूसने झेनफोन सीरिजमध्ये विंडोज १० आणि 6th जेन इंटेल कोर प्रोसेसरने सुसज्ज असलेले हे तीन फ्लॅगशिप लॅपटॉप आणले आहेत.
तिन्ही मॉडलमध्ये उत्कृष्ट फीचर आहेत आणि ४ मार्चपासून हे लॅपटॉप विक्रीसाठी आसूसच्या एक्सक्लुसिव स्टोर आणि ऑनलाइन रिटेलरवर उपलब्ध होतील.
आसूसने झेनबुक UX303UB लॅपटॉपची किंमत ७१,४९० रुपये ठेवली आहे. ह्या लॅपटॉपमध्ये 13.3 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्याचे डिस्प्ले रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे. ह्याचे व्ह्यूविंग अँगल्स 170 डिग्री आहे. हा लॅपटॉप 2.3GHz इंटेल कोर i5-6200U प्रोसेसर, इंटेल HD ग्राफिक्स GPU (2GB) चिप आहे आणि 8GB चा रॅम (4GB इनबिल्ट आणि 4GB DRAM DDR3L चिप) ने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्या लॅपटॉपमध्ये एक TB SATA हार्ड ड्राइव, एक HD वेब कॅमेरा, 802.11AC सपोर्ट+ब्लूटुथ 4.0 (ड्यूल बँड), तीन USB 3.0 पोर्ट, एक मिनी डिस्प्ले पोर्ट, एक्सटर्नल व्हिडियो डिस्प्लेसाठी एक HDMI 1.4 पोर्ट सारखे फीचर्स आहेत.
आसूस झेनबुक UX305CA लॅपटॉपची किंमत ५५,४९० रुपये आहे. ह्या लॅपटॉपमध्ये १३.३ इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा लॅपटॉप 2.2 इंटेल कोर M-36Y30 प्रोसेसर, इंटेल ग्राफिक्स 515 आणि 8GB (कंपनीनुसार, 4GB ऑनबोर्ड मेमरी आणि 4GB स्टोरेज मेमरी) रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 256GB SSD सोडून ह्यातील इतर सर्व वैशिष्ट्ये UX303UB झेनबुक सारखेच आहेत.
आता बोलूया आसूस UX305UA लॅपटॉपबद्दल. कंपनीने ह्याची किंमत ७४,१९० रुपये आहे. कंपनीने ह्यात 13.3 इंचाची QHD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे व्ह्युविंग अँगल 170 डिग्री आहे. हा लॅपटॉप 2.5GHz इंटेल कोर 6500U प्रोसेसर, इंटेल HD ग्राफिक्स 520 आणि 8GB ची DDR3 रॅमने सुसज्ज आहे. त्याचबरोबर ह्यात 512GB ची SSD, दोन USB 3.0 पोर्ट आणि USB 2.0 पोर्ट दिला गेला आहे.
हेदेखील वाचा – व्हॉट्सअपमध्ये समाविष्ट झाले नवीन शेअरिंग फीचर
हेदेखील वाचा – हे आहेत २०,००० किंमतीत येणारे दोन उत्कृष्ट आयपॅड