जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप आसूस ROG GX700 भारतात लाँच

जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप आसूस ROG GX700 भारतात लाँच
HIGHLIGHTS

Asus ROG GX700 लॅपटॉपची किंमत ४,१२,९९० रुपये आहे आणि हा एक हायड्रो ओवरक्लॉकिंग सिस्टम कूलिंग मोड्यूलसह येतो, ज्याला वेगळे करता येऊ शकते.

आसूसने भारतात आपला नवीन गेमिंग लॅपटॉप ROG GX700 लाँच केला आहे. हा जगातील पहिला लिक्विड कूल्ड लॅपटॉप आहे. ह्याची किंमत ४,१२,९९० रुपये आहे. हा लॅपटॉप केवळ आसूसच्या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. मात्र त्याआधी यूजरला कंपनीला ऑर्डर द्यावी लागेल. हा लॅपटॉप एक हायड्रो ओव्हरक्लॉकिंग सिस्टम कूलिंग मॉड्यूलसह येतो ज्याला वेगळे करता येऊ शकते. ह्या लॅपटॉपसोबत ब्रीफकेसही दिली आहे. हा लॅपटॉप 6th जेन इंटेल कोर i7 प्रोसेसर आणि 64GB रॅमने सुसज्ज आहे.

कंपनीचा दावा आहे की ही सिस्टम लॅपटॉपला केवळ थंडच ठेवत नाही, तर हा CPU ला ४८ टक्क्यांपर्यंत ओवरक्लॉक करतो आणि ह्याच्या  64GB रॅमला 43% टक्क्यांपर्यंत ओवरक्लॉक करतो. ह्या लॅपटॉपमध्ये एक NIVDIA GeForce GTX 980 ग्राफिक्स कार्ड दिला आहे आणि ह्यात सर्वसाधारण कूलिंग होते.

हेदेखील पाहा – [Marathi] Coolpad Max Unboxing – कूलपॅड मॅक्स अनबॉक्सिंग

ह्यात 17.3 इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ह्यात तीन USB 3.0 पोर्ट्स आणि एक USB टाइप C पोर्टसुद्धा दिले आहेत. हा एक HDMI पोर्टसह येतो.

हेदेखील वाचा – अॅमेझॉन इंडियावर ३०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतायत हे गॅजेट्स

त्याचबरोबर कंपनीने ROG Strix GL502 गेमिंग लॅपटॉपसुद्धा लाँच केला आहे. ह्याची किंमत १,२७,९९० रुपये आहे आणि हा इंटेल कोर i7 प्रोसेसर आणि 8GB रॅमने सुसज्ज आहे. ह्यात 15.6 इंचाची 4k डिस्प्ले दिली आहे.

हेदेखील वाचा – एअरटेल, आयडिया, वोडाफोनने लागू केले GSMA मोबाईल कनेक्ट सोल्युशन
हेदेखील वाचा – नोकियाच्या स्मार्टफोन्समध्ये असणार 2K डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर?

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo