आसुसचे A सीरिजचे तीन नवीन लॅपटॉप लाँच
आसुसचे A सीरिजचे लॅपटॉप विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. तसेच उत्कृष्ट साऊंड क्वालिटीसाठी सोनिकमास्टरसोबत एक्सक्लूसिव्हली ऑडियोविजार्डचा सुद्धा उपयोग केला गेला आहे.
मोबाईल डिवाईस बनवणारी कंपनी आसुसने बाजारात असलेल्या A सीरिजच्या अंतर्गत तीन नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. हे तीन लॅपटॉप आहेत, लॅपटॉप A553, A555LAF आणि A555LA. ह्यांची किंमत २३,००० पासून सुरु होते. ह्या तीन लॅपटॉपसोबत कंपनी २ वर्षांची वॉरंटीसुद्धा देत आहे. आसुसचा A सीरिज लॅपटॉप विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि त्यावर गेमिंगचाही उत्कृष्ट अनुभव मिळतो. तसेच उत्कृष्ट साऊंड क्वालिटीसाठी सोनिकमास्टरसोबत एक्सक्लूसिव्हली ऑडियोविजार्डचा सुद्धा उपयोग केला गेला आहे.
आसुस A553 नोटबुकच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात इंटेल क्वाडकोर पॅटिनम N3540 प्रोसेसर दिला गेला आहे. ह्यात १५.६ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन १३३६x७६८ पिक्सेल आहे. त्याचबरोबर ह्यात ४जीबीची रॅंम आणि ५००जीबीचे स्टोरेज समाविष्ट आहे. ह्याची किंमत २३,००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप ४ खास रंगांत उपलब्ध होईल. त्यात जांभळा, गुलाबी, काळा आणि पांढरा या रंगांचा समावेश आहे.
आसुस A555LAF लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात १५.६ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे. ज्याचे रिझोल्युशन १३६६x७६८ पिक्सेल आहे. ह्यात १.७ Ghz इंटेेल कोर i3-4005U प्रोसेसर आणि ४जीबीची रॅम दिली गेली आहे. ह्याची किंमत ३४,१९० रुपये ठेवण्यात आली आहे.
तर A555LA लॅपटॉपमध्येही १५.६ इंचाची डिस्प्ले दिली आहे, ज्याचे रिझोल्युशन १३६६x७६८ पिक्सेल आहे. ह्यात १.७ Ghz इंटेल कोर i3-4005U प्रोसेसर आणि ४जीबी रॅम दिली गेली आहे. ज्याची किंमत २८,९९० रुपये आहे.
ह्या तिन्ही लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी USB 3.0, HDMI, ब्लूटूथ आणि वाय-फाय दिले गेले आहे.
Digit NewsDesk
Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile