आसूसने आपल्या नवीन रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) अंतर्गत गेमिंग डेस्कटॉप आणि लॅपटॉप लाँच केेले आहे. आसूसने ROG G20 आणि GT51 डेस्कटॉप लाँच केले आहे. कंपनीने ROG G5501VW, G551VW, G752VY, GL552VM लॅपटॉप लाँच केले आहेत. ह्या गेमिंग डेस्कटॉपची किंमत १,२२,९९० रुपयांपासून सुरु होते. तर लॅपटॉपची किंमत ८२,४९० रुपयांपासून सुरु होते.
आसूस ROG GT51 मध्ये 6th जेन इंटेल कोर i7-6700K प्रोसेसर आणि NVIDIA GeForce GTX TITAN C (2-way SLI) आहे. हा डेस्कटॉप ROG टर्बो गियरसह येतो, ज्याच्या मदतीने यूजर्स डेस्कटॉपला ओवरक्लॉक करु शकता. ह्यात एक USB 3.1 टाइप C पोर्टसुद्धा दिला आहे. हा ROG बँडसह येतो.
ROG G20 एक गेमिंग डेस्कटॉप आहे, जो 2.5 इंच आणि 3.5 इंच SSD आणि HDD स्लॉटसह येतो. ह्यात NVIDIA GTX 980 ग्राफिक्स आणि M.2 PCle Gen 3×4 SSD साठी सपोर्ट आहे.
ROG G551VW गेमिंग लॅपटॉप 4K IPS पॅनलसह सुसज्ज आहे. हा सोनिक मास्टर आणि ऑडियोविझार्ड ऑडियोसह येतो. हा डिवाइस NVIDIA GTX 860M ग्राफिक्ससह 4GB GDDR5 ग्राफिक्स मेमरीसह येतो. ह्यात 16GB सिस्टम मेमरीसुद्धा आहे. ह्या लॅपटॉपमध्ये 1TB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. त्याचबरोबर ह्यात 128GB SSD सुद्धा दिली आहे.
हेदेखील वाचा – भारतीय ग्राहकांना टेस्ला मॉडल 3 विषयी ह्या गोष्टी माहित आहे का?
ROG GL552VW क्वाड-कोर 6th जेन इंटेल कोर i7 स्कयलेक प्रोसेससर आणि 16GB च्या सिस्टम मेमरीने सुसज्ज आहे. हा लॅपटॉप NVIDIA GTX 960M ग्राफिक्स सह 4GB GDDR5 ग्राफिक्स मेमरीसह येतो. ह्या लॅपटॉपमध्ये 1TB चे स्टोरेज आणि 128GB SSD चा सपोर्टसुद्धा दिले आहे.
ROG GT51 आणि ROG G20CB गेमिंग डेस्कटॉपची किंमत ३,२५,९०० रुपये आणि १,२२,९९० रुपये आहे. तर ROG G501VW ची किंमत ९५,४९० रुपये आणि G551VW ची किंमत १,००,४९० रुपये आहे. G752VY आणि GL552VW ची किंमत १,७९,९९० रुपये आणि ८२,४९० रुपये आहे.
हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – मोटो X फोर्सवर मिळतेय आतापर्यंतची सर्वात मोठी सूट