भारीच की ! फक्त 2,000 रुपयांत नवीन लॅपटॉप खरेदी करा, अप्रतिम ऑफर्ससह Flipkart वर उपलब्ध

भारीच की ! फक्त 2,000 रुपयांत नवीन लॅपटॉप खरेदी करा, अप्रतिम ऑफर्ससह Flipkart वर उपलब्ध
HIGHLIGHTS

Asus Chromebook Celeron Dual Core लॅपटॉपवर एक्सचेंज ऑफरसह दिला जात आहे.

त्यामुळे, Flipkartवरून हा लॅपटॉप केवळ 2 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.

एक्सचेंज ऑफरसह मिळणारा फायदा जुन्या लॅपटॉपच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असतो.

जर तुम्हाला नवीन लॅपटॉप घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी तुमचा बटवा तपासावा लागतो. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या ऑफरमुळे लॅपटॉप केवळ 2,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. एका खास डीलसह मजबूत फीचर्स असलेला लॅपटॉप खरेदी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. ही सूट Asus Chromebook Celeron Dual Core वर दिली जात आहे. नवीन लॅपटॉप फ्लिपकार्टवर खास ऑफरसह केवळ 2,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मात्र, यासाठी तुमच्याकडे जुना लॅपटॉप असणे आवश्यक आहे जो तुम्हाला एक्सचेंज करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटच्या रूपात सर्वात मोठ्या सवलतीचा लाभ मिळणार  आहे. 

हे सुद्धा वाचा : Realme 10 4G : जबरदस्त फोन नव्या कलर व्हेरिएंटमध्ये होणार लाँच, बघा Photos…

बघा खास ऑफर : 

Flipkart डीलमध्ये ग्राहकांना Asus Chromebook Celeron Dual Core लॅपटॉप अतिशय कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या Chromebook ची किंमत 22,990 रुपये आहे पण त्यावर 17 टक्के सवलत मिळत आहे. सध्या हा लॅपटॉप डिस्काउंटसह 18,990 रुपयांना सूचीबद्ध आहे. 

हा लॅपटॉप खरेदी करताना तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुने डिव्हाइस असल्यास, फ्लिपकार्ट 17,000 रुपयांपर्यंत संपूर्ण एक्स्चेंज डिस्काउंट देत आहे. जर तुम्हाला या सवलतीचा पूर्ण फायदा मिळाला तर नवीन लॅपटॉपची किंमत 18,990 रुपयांऐवजी फक्त 1,990 रुपये असेल. मात्र हे लक्षात घ्या की, एक्सचेंज ऑफरसह मिळणारा फायदा जुन्या लॅपटॉपच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असतो. खरेदी करण्यासाठी क्लिक करा… 

Asus Chromebook लॅपटॉप

Asus Chromebook मध्ये 11.6-इंच लांबीचा मोठा डिस्प्ले मिळतो आणि त्याचे वजन फक्त 1kg आहे. 4GB रॅम व्यतिरिक्त यात 32GB EMMC इंटर्नल स्टोरेज आहे. डिव्हाइस इंटेल सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात मायक्रो SD कार्ड रीडरशिवाय 1 USB टाइप-A आणि USB टाइप-C पोर्ट आहे. यात WiFi 5 आणि Bluetooth v4.0 कनेक्टिव्हिटी आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo