आसूस A540LA आणि R558UR नोटबुक भारतात लाँच
आसूस R558UR मध्ये एक पुर्ण HD डिस्प्ले आणि GT930 ग्राफिक्स दिले आहे, तर आसूस A540 मध्ये ग्लॉसी ब्रश फिनिश आहे.
आसूसने बाजारात आपले दोन नवीन नोटबुक A540 आणि R558UR लाँच केले आहेत. दोन्ही लॅपटॉप USB टाइप-C कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. कंपनीचा दावा आहे की, हे फीचर असलेला कंपनीचा ह्या सेगमेंटमधील हा पहिला लॅपटॉप आहे. आसूस R558UR लॅपटॉप R558UF चे GT930MX ग्राफिक्स कार्ड दिले आहे. ह्यात एक ऑडियो सिस्टमसुद्धा आहेत. आसूस A540 मध्ये ग्लॉसी ब्रश फिनिश दिली आहे. ह्याचे वजन 2 किलोग्रॅमपेक्षाही कमी आहे. R558UR प्रमाणे A540 मध्येही ऑडियो सिस्टम दिला गेला आहे. A540LA ची किंमत २०,९९० रुपये आहे तर R558UR ची किंमत ४३,९९० रुपये आहे.
आसूस R558UR नोटबुकमध्ये 15.6 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा इंटेल कोर i5-6200U (2.3GHz) प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 4GB ची रॅम देण्यात आली आहे. ह्यात नवीडिया GT930MX ग्राफिक्स दिले गेले आहे.
हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…
आसूस A540LA नोटबुकमध्ये 15.6 इंचाची HD डिस्प्ले दिली गेली आहे. ह्या डिस्प्लेचे रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. हा इंटेल कोर i3-4005U प्रोसेसरने सुसज्ज आहे. ह्यात 4GB ची रॅम दिली आहे. ह्यात इंटेल HD ग्राफिक्स 4400 सुद्धा आहे. हा सुद्धा ऑडियो सिस्टमसह येतो.
हेदेखील पाहा – वनप्लस 3 स्मार्टफोन: एक्सक्लुसिव्हली अॅमेझॉन इंडियावर विक्रीसाठी उपलब्ध
हेदेखील वाचा – नुकतेच लाँच झालेल्या शाओमी आणि मिजू स्मार्टफोनमध्ये कोण आहे श्रेष्ठ???