अॅप्पलने बाजारात आपला नवीन मॅकबुक लाँच केला आहे. अॅप्पलने ह्या नवीन डिवाइसला नवीन प्रोसेसर आणि उत्कृष्ट बॅटरी लाइफसह सादर केले आहे. हा रोझ गोल्ड रंगात उपलब्ध होईल आणि कंपनीने ह्याची किंमत १,०६,९०० रुपये ठेवली आहे. नवीन मॅकबुक 6th जेन ड्यूल-कोर इंटेल कोर M प्रोसेसरसह लाँच केला आहे. ज्याची क्लॉक स्पीड 1.3GHz, बूस्ट स्पीड 3.1GHz आहे. अॅप्पलनुसार, ह्या नवीन डिवाइसवर १० तासांची वायरलेस वेब ब्राउझिंग केली जाऊ शकते. ह्यावर 11 तासांपर्यंत iTunes मूव्ही प्लेबॅक केली जाऊ शकते. ह्या नवीन डिवाइसमध्ये इंटेल HD ग्राफिक्स 515, PCle-आधारित फ्लॅश स्टोरेजसुद्धा आहे. तसेच अॅप्पलने अशीही माहिती दिली आहे की, आता सर्व १३ इंचाच्या मॅकबुक एयर डिवाइसमध्ये 8GB ची रॅम मिळेल.
ह्या नवीन मॅकबुकमध्ये 1.1GHz ड्यूल-कोर इंटेल कोर M3 प्रोसेसर, 2.2GHz ची टर्बो बूस्ट स्पीड, 8GB ची रॅम आणि 256GB फ्लॅश स्टोरेज आहे, ह्याची किंमत १,०६,९०० रुपये आहे. तर 1.2GHz ड्यूल-कोर इंटेल कोर M5 प्रोसेसर, 2.7GHz टर्बो बूस्ट स्पीड, 8GB ची रॅम आणि 512MB ची फ्लॅश स्टोरेज असलेल्या मॅकबुकची किंमत १,२९,००० रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने कॉन्फिगर-टू-ऑर्डरचा पर्यायसुद्धा दिला आहे. ज्याच्या अंतर्गत 1.3GHz ड्यूल-कोर इंटेल कोर M7 प्रोसेसर ज्याची बूस्ट स्पीड 3.1GHz आहे. हा मॅकबुक 12 इंच रेटिना डिस्प्ले आणि एक फोर्स टच ट्रॅकपॅडसह येतो, हा डिवाइस एक USB टाइप-C पोर्टसह येतो.
हेदेखील वाचा – 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स
हेदेखील वाचा – सोनीने लाँच केला A6300 मिररलेस कॅमेरा, किंमत ७४,९९० रुपये