Apple Scary Fast Event: नवीन 14 इंच आणि 16 इंच MacBook Pro M3 चिपसह लाँच, जाणून घ्या किंमत

Apple Scary Fast Event: नवीन 14 इंच आणि 16 इंच MacBook Pro M3 चिपसह लाँच, जाणून घ्या किंमत
HIGHLIGHTS

Apple Scary Fast इव्हेंट 30 ऑक्टोबर रोजी पार पडला.

कंपनीने 14 इंच आणि 16 इंच डिस्प्लेसह नवीन MacBook Pro लॅपटॉप लाँच केले.

सर्व मॉडेल्स आजपासून Apple India वर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत.

30 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या Apple Scary Fast इव्हेंटमध्ये कंपनीने 14 इंच आणि 16 इंच डिस्प्लेसह नवीन MacBook Pro लॅपटॉप लाँच केले आहेत. हे दोन्ही लॅपटॉप नवीन चिपसेट M3, M3 Pro आणि M3 Max सह आणण्यात आले आहेत. सर्व मॉडेल्स दीर्घकाळ टिकणाऱ्या पावरफुल बॅटरीसह आणण्यात आले आहे. चला त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

Apple MacBook Pro ची भारतात किंमत

M3 चिप असलेला 14-इंचाचा MacBook Pro हा केवळ दैनंदिन कामांसाठी चांगला पर्याय नाही. खरं तर, हे प्रो Apps आणि गेममध्ये देखील चांगले कार्य करते. याची सुरुवातीची किंमत 1,69,900 रुपये आहे. M3 Pro आणि M3 Max MacBook Pro हे मॉडेल स्पेस ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहेत. तर, M3 Pro आणि M3 Max मॉडेल सिल्वर कलरमध्ये उपलब्ध आहेत आणि M3 सह 14-इंच लांबीचा MacBook Pro सिल्व्हर आणि स्पेस ग्रे कलरमध्ये येतो.

apple macbook pro

उपलब्धता आणि प्री-ऑर्डर

सर्व मॉडेल्स आजपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहेत. Apple India च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्यांना प्री-बुक करू शकता. लॅपटॉप 7 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Apple MacBook Pro चे फीचर्स

सर्व MacBook Pro मॉडेल्समध्ये Liquid Retina XDR डिस्प्ले आहे. लॅपटॉपमध्ये इनबिल्ट 1080p कॅमेरा आहे. या लॅपटॉपमध्ये इमर्सिव्ह सिक्स-स्पीकर साउंड सिस्टमसह कनेक्टिव्हिटीसाठी अनेक पर्याय आहेत. M3 Max सह नवीन MacBook Pro 128GB पर्यंत रॅम मिळत आहे. हे लॅपटॉप गेम चेंजिंग ग्राफिक्स परफॉर्मन्स प्रदान करतील.

M3 चिप असलेला 14-इंच लांबीचा MacBook Pro लॅपटॉप M1 चिप असलेल्या MacBook Pro पेक्षा 60% वेगवान आहे. M3 Pro चिप असलेला 16-इंच लांबीचा MacBook Pro लॅपटॉप M1 Pro सह सुसज्ज असलेल्या 16-इंचाच्या MacBook Pro पेक्षा 40% वेगवान आहे. लॅपटॉपमध्ये पावरफुल बॅटरी आहे, जी 22 तासांपर्यंत बॅटरी लाईफ देते. आम्ही तुम्हाला सांगतो की, डिझाईनच्या बाबतीत विशेष बदल झालेला नाही, कंपनीचे मेन फोकस चिपसेटवर आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo