अप्रतिम ऑफर: Apple चा लॅपटॉप मिळतोय ₹ 24,100 पेक्षा कमी किमतीत

अप्रतिम ऑफर: Apple चा लॅपटॉप मिळतोय ₹ 24,100 पेक्षा कमी किमतीत
HIGHLIGHTS

Apple चा लॅपटॉप ₹ 24,100 पेक्षा कमी किमतीत खरेदी करा

कंपनीकडून विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

विद्यार्थी फक्त ₹ 95,800 मध्ये लॅपटॉप खरेदी करू शकतात.

 जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. Apple चा MacBook Air M2 सध्या बंपर सवलतीसह उपलब्ध आहे. Apple ने यावर्षी आपला नवीन MacBook Air M2 लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा उत्तम कामगिरी करतो. कंपनीने MacBook Air M2 चे बेझल कमी करण्यासाठी देखील बरेच काम केले आहे. जेणेकरुन वापरकर्त्याला उत्कृष्ट डिस्प्ले अनुभव मिळेल.

किंमत :

Apple MacBook Air M2 ची किंमत 1,19,990 रुपये आहे. मागील जनरेशनच्या मॉडेलच्या किमतीपेक्षा ते 30 टक्क्यांनी महाग आहे. जुन्या मॉडेलची किंमत 92,900 रुपये होती. कंपनीने आता जुन्या MacBook Air M1 ची किंमत 92,900 रुपयांवरून 99,900 रुपयांपर्यंत वाढवली आहे. पण काळजी करू नका, कारण आता तुम्ही Apple MacBook Air M2 मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याची संधी आहे. 

हे सुध्दा वाचा : Realme 9i 5G भारतात लॉन्च, कमी किमतीत मिळतोय उत्तम कॅमेरा आणि प्रोसेसर, जाणून घ्या फीचर्स

विशेषतः , Apple विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शैक्षणिक ऑफर देत आहे. ज्याद्वारे विद्यार्थी केवळ ₹95,800 च्या प् किमतीत MacBook Air M2 खरेदी करू शकतात. होय, Apple चा नवीनतम लॅपटॉप ₹ 24,100 इतक्या कमी किमतीत खरेदी केला जाऊ शकतो. 

macbook air m2

MacBook Air M2 वर ₹24,100 ची सूट मिळवण्यासाठी स्टेप्स :

– ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे Apple च्या इंडिया वेबसाइटवर स्टूडेंट प्रोफाइल असणे आवश्यक आहे आणि ते UNiDays द्वारे वेअरीफाईड केलेले असणे आवश्यक आहे. विद्यार्थी नसल्यास, तुम्हाला विद्यार्थी ओळखपत्राची व्यवस्था करावी लागेल.

–  त्यानंतर, खरेदीदाराला कार्टमध्ये MacBook Air M2 जोडण्यासाठी पुढे जावे लागेल. यावेळी, लॅपटॉपची किंमत फक्त ₹1,09,900 असेल.

–  कंपनी ऍपल स्टुडंट डिस्काउंटसह 14,100 रुपये किमतीचे एअरपॉड्स मोफत देत आहे. याचा फायदा घेतल्यानंतर लॅपटॉपची प्रभावी किंमत ₹ 95,800 असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo