नवीन Apple MacBook Air आणि Pro लॅपटॉप लाँच, विद्यार्थ्यांना मिळणार 10 हजार रुपयांनी स्वस्त

Updated on 07-Jun-2022
HIGHLIGHTS

Apple MacBook Air आणि Pro लॅपटॉप लाँच

दोन्ही लॅपटॉपच्या बेस व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 1,19,900 रुपये आणि 1,29,900 रुपये.

विशेष म्हणजे कंपनी विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची सूट देणार आहे.

Apple च्या वार्षिक WWDC (वर्ल्ड वाइड डेव्हलपर कॉन्फरन्स) 2022च्या पहिल्या दिवशी कंपनीने काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. Apple ने नवीन ऑपरेटिंग सिस्टम iOS 16, तसेच नवीन M2 चिपसेटसह 13-इंच मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो लॅपटॉपची घोषणा केली आहे. मॅकबुक एअरला नवीन डिझाइन मिळाले आहे, तर मॅकबुक प्रो ची डिझाईन तशीच ठेवण्यात आली आहे.

MacBook Air M2ची विशेषता

नवीन लॅपटॉपचा डिस्प्ले आता मॅकबुक प्रो 14-इंच सारख्या नॉचसह येतो. त्याचप्रमाणे, कंपनीने आता FaceTime चा कॅमेरा 720p ऐवजी 1080p वर अपग्रेड केला आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये 2 थंडरबोल्ट किंवा 4 USB पोर्ट देण्यात आले आहेत. यावेळी लॅपटॉपमध्ये ट्रू टोन टेक्नॉलॉजीसह 13.6 इंच लांबीचा लिक्विड रेटिना डिस्प्ले वापरण्यात आला आहे. MacBook Air M2 11.3mm स्लिम आहे. त्याबरोबरच, हा डिवाइस सिल्व्हर, स्टारलाईट, स्पेस ग्रे आणि मिडनाईट या चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. लॅपटॉपचे वजन 1.2 kg आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. 

हे सुद्धा वाचा: तुमची मुलं सुद्धा YouTube, Netflix बघतात ? 'अशा'प्रकारे ऍडल्ट कंटेन्ट ब्लॉक करा

याव्यतिरिक्त, कंपनीने मॅकबुक एअरमध्ये MagSafe चार्जिंग तंत्रज्ञान परत आणले आहे. यावेळी लॅपटॉपमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्यायही देण्यात आला आहे. कंपनी लॅपटॉपसोबत बॉक्समध्ये 30W फास्ट चार्जर देईल. परंतु Apple ऑनलाइन स्टोअरमधून खरेदी करणारे भारतीय ग्राहक 35W किंवा 67W फास्ट चार्जरमध्ये अपग्रेड करू शकतात. M2 चिपमुळे, तुम्हाला नवीन लॅपटॉपमध्ये उत्तम परफॉर्मन्स आणि सर्वोत्तम युजर एक्सपेरियन्स मिळेल.

दोन्ही लॅपटॉपची किंमत

MacBook Air M2 अधिकृत Apple ऑनलाइन स्टोअर इंडियावर 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत सूचीबद्ध केले गेले आहे. ही बेस व्हेरिएंटची (256GB स्टोरेज) किंमत आहे. त्याचप्रमाणे, युजर अधिक स्टोरेज व्हेरिएंट देखील निवडू शकतात, ज्यासाठी जास्त किंमत मोजावी लागेल. फास्ट चार्जरलाही जास्त पैसे देऊन खरेदी करावे लागेल. त्याचप्रमाणे, MacBook Pro M2 चे बेस मॉडेल (256GB स्टोरेज) 1,29,900 रुपयांपासून सुरू होईल. विशेष म्हणजे कंपनी विद्यार्थ्यांना 10 हजार रुपयांची सूट देणार आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :