Apple ने WWDC 2023 इव्हेंटमध्ये MacBook Air 15 लॅपटॉप लॉन्च केला होता. या लॅपटॉपची पहिली विक्री आज म्हणजेच 13 जूनपासून सुरु झाली आहे. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा लॅपटॉप आहे, ज्याची स्क्रीन 15.3 इंच आहे.
Apple MacBook Air 15 ची किंमत 1,34,900 रुपये ठेवण्यात आली आहे. खरं तर, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप 1,24,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 4000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. लॅपटॉप कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, स्टोअर्स आणि ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून EMI आणि एक्सचेंज ऑफरसह आजपासून खरेदी केला जाऊ शकतो.
वर सांगितल्याप्रमाणे, हा लॅपटॉप 15.3-इंच लांबीच्या डिस्प्लेसह येतो. लॅपटॉपमध्ये 8GB युनिफाइड मेमरी आणि 512GB SSD अंतर्गत स्टोरेजसह M2 चिपसेट आहे. या फीचरसह हा लॅपटॉप अधिक वेगवान होणार आहे. लॅपटॉपमध्ये मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 18 तास टिकते, असा कंपनीचा दावा आहे.
कंपनीने MacBook Air लॅपटॉपमध्ये तीन मायक्रोफोन, ANC सह 6 स्पीकर आणि 4 फोर्स कॅन्सलिंग वूफर दिले आहेत. त्याबरोबरच, यामध्ये डॉल्बी ATMOS चा देखील सपोर्ट आहे.