कंम्प्यूटर निर्माता कंपनी एसरने बाजारात आपला नवीन आणि सर्वात स्वस्त असा लॅपटॉप क्रोमबुक 14 लाँच केला आहे. ह्या क्रोमबुकची किंमत 299.99 डॉलर (जवळपास १९,९०० रुपये) ठेवण्यात आली आहे.
एसर क्रोमबुक 14 लॅपटॉपच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 14 इंचाची पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे. हा लॅपटॉप दोन स्क्रीन रिझोल्युशन पर्यायासह लाँच केला गेला आहे. ह्यात एक पुर्ण HD डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 1920×1080 पिक्सेल आहे आणि दुसरी डिस्प्ले रिझोल्युशन 1366×768 पिक्सेल आहे. स्क्रीन मेटल चेसिसच्या आत असेल. ह्या लॅपटॉपमध्ये क्रोम ओएस देण्यात आला आहे.
ह्या लॅपटॉपची सर्वात खास गोष्ट म्हणजे ह्याचा बॅटरी बॅकअप. कंपनीचा दावा आहे की, ह्या लॅपटॉपमध्ये जी बॅटरी आहे, ती १४ तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते. एसरचा दावा आहे की, १०८० पिक्सेल रिझोल्युशन डिस्प्ले असलेल्या क्रोमबुकची बॅटरी पुर्ण चार्ज १२ तासांपर्यंत आणि HD रिझोल्युशन असलेली बॅटरी लाइफ १४ तासांपर्यंत चालेल.
हेदेखील पाहा – Le इको ली 1S ओव्हरव्ह्यू Video
हा लॅपटॉप दोन वेगवेगळ्या प्रोसेसरसह बाजारात आणला आहे. एसरने क्वाड-कोर इंटल सेलेरॉन प्रोसेसर आणि ड्यूल कोर 1.6GHz इंटल सेलेरॉन N3060 प्रोसेसरच्या दरम्यान निवडण्याचा विकल्प दिला आहे.
ह्याच्या इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात 2GB किंवा 4GB रॅम, 16GB किंवा 32GB स्टोरेज आणि ड्यूल बँड 802.11AC वायफाय, दोन USB 3.1 टाइप A-पोर्ट, HDMI आणि HD वेबकॅम यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा – Voot:भारतात लाँच झाली व्हिडियो-ऑन-डिमांड सेवा
हेदेखील वाचा- मेगा मोबाईल सेल: अॅमेझॉनच्या काय आहेत खास ऑफर्स