लॅपटॉप लाइनअप वाढवत, Acer ने Aspire 7 लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. नवीन Aspire 7 लॅपटॉप 12th-Gen Intel Core प्रोसेसरसह येतो. यात Nvidia GeForce GTX ग्राफिक्स आणि इम्प्रूव्ड थर्मल परफॉर्मन्स देखील आहे. कंपनीने सांगितले की, ज्यांना गेमिंग, डिझायनिंग आणि कंटेंट क्रिएशनमध्ये चांगली कामगिरी असलेले हलके वजनाचे मशीन हवे आहे, त्यांना लक्षात घेऊन हा लॅपटॉप बनवण्यात आला आहे.
कंपनीने 62,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत Acer Aspire 7 सादर केला आहे. हा लॅपटॉप Acer ऑनलाइन स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल. हे जुन्या मॉडेलचेच रिफ्रेश केलेले व्हेरिएंट आहे.
हे सुद्धा वाचा : महिलांसाठी WhatsApp ची सुपर ट्रिक, अशाप्रकारे ट्रॅक करा तुमची menstrual cycle
Acer Aspire 7 मध्ये 12th-Gen Intel Core i5 आणि Nvidia GeForce GTX 1650 ग्राफिक्स आहेत. या लॅपटॉपमध्ये 32GB पर्यंत DDR5 RAM आणि 2TB ड्युअल SSD आहे. या लॅपटॉपमध्ये FHD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे.
त्याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 81.67% आहे. या पॅनलमध्ये Acer Blue Light Shield आणि Acer ExaColor टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, ती अधिक उत्तम व्हिज्युअल ऑफर करेल. या लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6 आणि 6E सपोर्ट करण्यात आला आहे.
याशिवाय ब्लूटूथ 5.2 आणि थंडरबोल्ट 4 कनेक्टिव्हिटीचा पर्यायही यामध्ये देण्यात आला आहे. यात 15.6-इंच लांबीची फुल-HD स्क्रीन आहे. कंपनीने सांगितले की, या लाइनअपमध्ये Aspire 7 गेमिंग लॅपटॉप हा त्यांचा सर्वाधिक विकला जाणारा गेमिंग लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये 135W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 50Wh ची बॅटरी आहे.