विनीत कुमार सिंग आणि आकांक्षा सिंग अभिनित ‘रंगबाज 3’ वेब सिरीजची ZEE5 कडून घोषणा

विनीत कुमार सिंग आणि आकांक्षा सिंग अभिनित ‘रंगबाज 3’ वेब सिरीजची ZEE5 कडून घोषणा
HIGHLIGHTS

ZEE5 कडून 'रंगबाज 3' वेब सिरीजची घोषणा

फुल ऑन गँगस्टर अवतारात विनीत कुमार सिंगचा लुक पहिला लुक रिलीज

एकूण 6 एपिसोडची वेब सिरीज

गँगस्टर ड्रामा 'रंगबाज'च्या पहिल्या दोन सीझनच्या यशानंतर आता ZEE5 ने सीझन 3 ची घोषणा केली आहे. 'रंगबाज – डर की राजनीती'मध्ये विनीत कुमार सिंह आणि आकांक्षा सिंह मुख्य भूमिकेत आहेत. NH10 आणि मनोरमा सिक्स फीट अंडरसाठी प्रसिद्ध असलेल्या नवदीप सिंग यांनी हा शो दिग्दर्शित केला आहे. रंगबाज 3 चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे, ज्यामध्ये विनीत सिंग फुल ऑन गँगस्टर अवतारात दिसत आहे.

हे सुद्धा वाचा : BSNL चा जबरदस्त ब्रॉडबँड: दरमहा 4TB डेटा, Disney+ Hotstar Premium मोफत; बिलवर तब्ब्ल 90% पर्यंत सूट

6 एपिसोडची वेब सिरीज

6 एपिसोडच्या या सिरीजमध्ये गीतांजली कुलकर्णी, सुधन्वा देशपांडे, अशोक पाठक, सोहम मजुमदार, प्रशांत नारायणन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिरीजबद्दल अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. तसेच, Zee5 ने शो च्या रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, चाहते सीरिजच्या रिलीजसाठी खूप उत्सुक आहेत आणि सोशल मीडियावर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE5 (@zee5)

दिग्दर्शक काय म्हणाले

रंगबाज 3 चे दिग्दर्शक नवदीप सिंग म्हणाले, “मी रंगबाजच्या जुन्या सीझनचा प्रशंसक आहे, कारण गुंडांच्या राजकारणाचे हे अंधकारमय जग मला आकर्षित करते. त्यामुळे, या सीझनचा एक भाग होण्यासाठी आणि चांगल्या, वाईट वेगवेगळ्या छटा असलेले एक नवीन पात्र तयार करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. 'रंगबाज-डर की पॉलिटिक्स' सिरीज साहेबच्या जीवनावर आधारित आहे, तसेच सिरीजमध्ये बिहारच्या राजकारणाचे चित्रण होते कारण या दोन्ही कथा एकत्र लिहिल्या गेल्या आहेत. ज्यांना 'राजकारण' आवडते त्यांच्यासाठी हा शो आहे. मला आशा आहे की प्रेक्षकांना सत्ता आणि राजकारण असलेला हा शो आवडेल कारण आम्ही तो पूर्णपणे वास्तविक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे."

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo