तुम्ही कदाचित तुमच्या आयफोन ६ मध्ये वापरू शकणार नाही एअरटेल 4G सेवा

Updated on 25-Jul-2022
HIGHLIGHTS

एअरटेल 4G सेवा आयफोन ६ आणि ६ प्लसशी विसंगत असल्याने त्यांचे बँडविथ जुळत नाही.

महिन्याभरापुर्वी एअरटेल 4G सेवांच्या प्रयोग चाचण्या चालू होत्या. मात्र सध्या त्या अॅप्पलच्या आयफोन६ आणि ६ प्लसशी संलग्न असलेल्या बँडविथशी विसंगत आहे. TDD फॉर्म ज्याला आता  LTE कनेक्टिव्हीटी आहे, ते दिल्लीच्या NCR च्या वर्तुळात पुरवले जातात. ते आयफोनशी विसंगत आहे, आणि म्हणून त्यांना एअरटेल LTE शी कनेक्ट होण्यास आता अवैध मानण्यात आले आहे.  

 

TDD म्हणजेच टाईम-डिव्हिजन डयुप्लेक्स ऑफ एलटीई, २३००MHz फ्रिक्वेन्सी बँडवर कनेक्टिव्हीटी पुरवतात तर FDD (फ्रिक्वेन्सी-डिव्हिजन डयुप्लेक्स) १८०० फ्रिक्वेन्सी बँडवर कनेक्टिव्हिटी पुरवतात. आयफोन ६ आणि ६ प्लसचे A1549 आणि A1522 मॉडेलवर GSM आणि CDMA नेटवर्क LTE नेटवर्कला बँड १-२९च्या माध्यमातून कनेक्ट होतात, मात्र ते FDD बँडविथमध्ये पडतात. एअरटेलने सर्वप्रथम कलकत्त्यात २०१२ मध्ये ४जी सेवा देण्यास सुरुवात केली होती, तेव्हा सुरुवातीला FDD बँडविथवर ४जी कनेक्टिव्हिटी आणण्यात आली होती.

 

सुरुवातीला अॅप्पलने आयफोन-४जी कॉम्प्लियंटच्या भारतीय आवृत्तीत सुधारणा करुन ते योग्यरित्या बनवून बाहेर आणले होते. आयफोन ६ आणि ६ प्लसचे A1586 आणि 1524 मॉडेल्स TDD नेटवर्कवर आधारित असलेल्या LTE बँड्स ३८-४१ ला सपोर्ट करत होते. जर तुमचा आयफोन ह्या मॉडेल पैकी एक नसेल तर वर उल्लेख केलेल्या TDD बँडविथवर तुमचा  एअरटेल ४जी कनेक्ट होऊ शकणार नाही. जोपर्यंत सुधारणा करुन उच्चस्तरीय फ्रिक्वेन्सी बँडविथ असलेले डिव्हाईस बनण्याची यत्किंचितही शक्यता दिसणार नाही,  तोपर्यंत जागतिक स्थरावर आयफोनच्या मॉडेल्समध्ये हा फरक आढळून येणार.

याच्या तुलनेने स्वस्त अशी सॅमसंग झिओमी आणि इतर सर्व सहत्व उत्पादक एअरटेलने दिलेल्या TDD बँडविथला सपोर्ट करतात. लवकरच व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर सारख्या सेवा प्रदाते भारतामध्ये LTE नेटवर्कची चाचण्या घेण्यास सुरुवात करणार आहे आणि FDD बँडविथच्या माध्यमातून कनेक्टिव्ही पुरवल्यामुळे आयफोनला ४जी कनेक्ट होऊ शकते.

अॅप्पलने अलीकडेच भारतातील आयफोनच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचा अहवाल सादर केला तसेच जागतिक प्रकाशनासोबत भारतात अॅप्पल संगीत premieringची  भारतीय बाजारातील रुची वाढत असल्याचेसुद्धा सांगितले.

Souvik Das

The one that switches between BMWs and Harbour Line Second Class.

Connect On :