सर्वांना माहितीच आहे की, जर तुमचे Aadhaar कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले असेल तर तुम्हाला तुमचे कार्ड अपडेट करावे लागेल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत आधार अपडेटची गरज नव्हती, पण आता सरकारने म्हटले आहे की, जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असेल किंवा 10 वर्षांत एकदाही अपडेट केले नसेल तर तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे.
लक्षात घ्या की, आधार अपडेटची सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी पैसे भरावे लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, घरी बसून तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज आहे.
हे सुद्धा वाचा: Airtel च्या New फिचरमुळे ग्राहकांची मोठी चिंता मिटेल, चोरी गेल्यानंतरही सहज मिळेल तुमचा फोन। Tech News
Aadhaar कार्ड अपडेटसाठी तुम्हाला केवळ दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पहिले म्हणजे तुमचे ओळखपत्र आणि दुसरे म्हणजे तुमचा ‘पत्ता पुरावा’ ( Adress Proof) होय. आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा 50 रुपये शुल्क आकारले जाते. परंतु UIDAI नुसार, ही सेवा 14 डिसेंबरपर्यंत मोफत आहे. ID Proof म्हणून तुम्ही मतदार कार्ड देखील वापरू शकता.
या रिक्वेस्ट नंबरवरून अपडेटचे स्टेटस देखील तपासण्यास सक्षम असाल. काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल. अशाप्रकारे तुम्ही ही सोपी प्रक्रिया फॉलो करून तुमचा Aadhar कार्ड सहज अपडेट करू शकता.