Aadhaar Update: अजूनही वेळ गेलेली नाही! Free मध्ये अपडेट करा तुमचा कार्ड, शेवटची तारीख 14 डिसेंबर। Tech News
तुमचे Aadhar कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले असेल तर तुमचे कार्ड अपडेट करावे लागेल.
आधार अपडेटची सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत आहे.
Aadhaar कार्ड अपडेटसाठी तुम्हाला केवळ दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता
सर्वांना माहितीच आहे की, जर तुमचे Aadhaar कार्ड 10 वर्षांपूर्वी बनवले असेल तर तुम्हाला तुमचे कार्ड अपडेट करावे लागेल. काही महिन्यांपूर्वीपर्यंत आधार अपडेटची गरज नव्हती, पण आता सरकारने म्हटले आहे की, जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने असेल किंवा 10 वर्षांत एकदाही अपडेट केले नसेल तर तुमचे आधार कार्ड अपडेट करण्याची गरज आहे.
लक्षात घ्या की, आधार अपडेटची सुविधा 14 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत आहे. त्यानंतर तुम्हाला यासाठी पैसे भरावे लागणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, घरी बसून तुम्ही तुमचे आधार कार्ड कसे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज आहे.
हे सुद्धा वाचा: Airtel च्या New फिचरमुळे ग्राहकांची मोठी चिंता मिटेल, चोरी गेल्यानंतरही सहज मिळेल तुमचा फोन। Tech News
महत्त्वाचे डॉक्युमेंट्स
Aadhaar कार्ड अपडेटसाठी तुम्हाला केवळ दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. पहिले म्हणजे तुमचे ओळखपत्र आणि दुसरे म्हणजे तुमचा ‘पत्ता पुरावा’ ( Adress Proof) होय. आधार अपडेटसाठी आधार केंद्रावर सहसा 50 रुपये शुल्क आकारले जाते. परंतु UIDAI नुसार, ही सेवा 14 डिसेंबरपर्यंत मोफत आहे. ID Proof म्हणून तुम्ही मतदार कार्ड देखील वापरू शकता.
Aadhaar Update करण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:
- मोबाइल किंवा लॅपटॉपवरून UIDAI वेबसाइटवर जा.
- अपडेट आधारच्या पर्यायावर क्लिक करा. आता आधार क्रमांक टाकून OTP द्वारे लॉग इन करा.
- यानंतर डॉक्युमेंट अपडेट वर क्लिक करा आणि व्हेरिफाय करा.
- आता खालील ड्रॉप लिस्टमधून ओळखपत्राची स्कॅन केलेली प्रत आणि ऍड्रेस प्रुफ अपलोड करा.
- आता सबमिट बटनवर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला एक रिक्वेस्ट नंबर मिळेल आणि फॉर्म सबमिट केला जाईल.
या रिक्वेस्ट नंबरवरून अपडेटचे स्टेटस देखील तपासण्यास सक्षम असाल. काही दिवसांनी तुमचा आधार अपडेट होईल. अशाप्रकारे तुम्ही ही सोपी प्रक्रिया फॉलो करून तुमचा Aadhar कार्ड सहज अपडेट करू शकता.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile