मोबाईल निर्माता कंपनी शाओमी ख्रिसमसचे औचित्य साधून आपल्या ग्राहकांना खूपच उत्कृष्ट ऑफर देत आहे. ह्या ऑफरचे नाव आहे ‘Very Mi christmas’. ख्रिसमस निमित्त शाओमीने आपल्या जवळपास सर्व प्रोडक्टवर बरीच सूट देण्याची घोषणा केली आहे. शाओमी इंडियाने ट्विटर आणि वेबपेजच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
ह्या ऑफरच्या अंतर्गत Mi इंडिया साइटवर क्रिसमस ऑफरमध्ये हॉट एक्सेसरीजचा ओपन सेलसुद्धा समाविष्ट आहे. ज्यात Mi बँडची किंमत ७९९ रुपये, Mi हेडफोनची किंमत ५,४९९ रुपये, Mi इन इयर हेडफोन बेसिक व्हाइटची किंमत २९९ रुपये आणि ह्यातील काळ्या प्रकाराची किंमत २९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
शाओमीची ही ऑफर काल रात्री १२ वाजल्यापासून सुरु झाली असून आज रात्री १२ वाजेपर्यंत आहे. क्रिसमस निमित्त शाओमीने आपल्या जवळपास सर्व प्रोडक्टवर बरीच सूट देण्याची घोषणा केली आहे. Mi इंडियावर मिळणा-या ह्या ऑफरमध्ये शाओमीने मेड इन इंडिया फोन रेडमी नोट प्राईमसह १९९ रुपयाचा Mi प्रोटेक्ट उपलब्ध होईल, ज्याची किंमत ३७५ रुपये आहे. तर Mi 4i स्मार्टफोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. त्याचबरोबर सॉफ्ट केस आणि LED लाइट मोफत दिली गेली आहे. तर दुसरीकडे Mi 4 सह मोफत इयरफोन उपलब्ध होईल. Mi 4 ची किंमत १४,९९९ रुपये आहे. तसेच Mi पॅडसह Mi इन इयर हेडफोन मोफत प्राप्त करु शकतात. तर रेडमी 2 सह मोफत बॅक कव्हर उपलब्ध होईल. तर रेडमी 2 प्राइमसह मोफत LED लाइट दिली गेली आहे.
ह्या ऑफरच्या अंतर्गत क्रिसमस लकी ड्रॉसुद्धा होईल, जो की आज सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत चालेल. ह्या लकी ड्रॉचे विजेते असे डिवाइस जिंकू शकतात, जे सध्यातरी भारतात उपलब्ध नाही, ज्यात इलाइट, ब्लूटुथ स्पीकर आणि 20000mAh चा Mi पॉवर बँकचा समावेश आहे.