त्याबरोबरच, Redmi Buds 4 Active ईयरबड्स देखील लाँच
Xiaomi Pad 6 टॅबलेटच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये
Xiaomi ने अखेर Xiaomi pad 6 भारतात लाँच केला. या टॅबलेटच्या लाँचची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु होती. त्याबरोबरच, Redmi Buds 4 Active ईयरबड्स देखील लाँच करण्यात आले आहेत. हा Xiaomi टॅबलेट स्टायलस आणि कीबोर्डला सपोर्ट करतो. टॅबलेटसह जबरदस्त प्रोसेसर आणि बॅटरी देण्यात आली आहे. चला बघुयात किंमत आणि स्पेसीफिकेशन्स –
किंमत :
Xiaomi Pad 6 टॅबलेटच्या 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. तर, 8GB + 256GB स्टोरेजची किमंत 28,999 रुपये आहे. या टॅबला सपोर्ट करणारा स्मार्ट पेन 5,999 रुपयांना आणि कीबोर्ड 4,999 रुपयांना मिळणार आहे. हा टॅब 21 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
याबरोबरच, कंपनीने Redmi Buds 4 Active ईयरबड्स लाँच केले आहेत. या नवीन इयरबड्सची किंमत 1,399 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रारंभिक ऑफरसह बड्स 1,199 रुपयांना खरेदी करता येतील. ज्याची विक्री 20 जूनपासून सुरू होईल.
Xiaomi pad 6 चे स्पेक्स
Xiaomi pad 6 मध्ये 2880 x 1800 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144hz च्या रीफ्रेश रेटसह 11-इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात आहे. प्रोटेक्शनसाठी स्क्रीनवर कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आला आहे. हा टॅब Android 13 आधारित MIUI 14 वर काम करतो. आम्ही तुम्हला सांगतो की, टॅबलेटमध्ये स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह 8GB LPDDR5 रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेज मिळेल.
कंपनीने या टॅबलेटमध्ये 8840mAh बॅटरी दिली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोटोग्राफीसाठी, Xiaomi Pad 6 मध्ये 13MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर समोर 8MP कॅमेरा मिळणार आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.