खरंच ! Xiaomi ने भारतातील ‘हा’ व्यवसाय केला बंद, आता युजर्सना करता येणार नाही ‘हे’ काम

Updated on 29-Oct-2022
HIGHLIGHTS

Mi Pay लाँच होऊन आता तीन वर्षांचा कालावधी

Xiaomi ने Mi Pay आणि Mi Credit ऍप्स आपल्या App Store आणि Google Play Store वरून रिमूव्ह केले

Xiaomi विरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट FEMA अंतर्गत खटला सुरू

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने भारतात आपला फायनान्शियल व्यवसाय बंद केला आहे, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, याबाबत कंपनीने अद्याप पुष्टी केलेली नाही. अहवालानुसार, Xiaomi ने Mi Pay आणि Mi Credit ऍप्स आपल्या App Store आणि Google Play Store वरून रिमूव्ह केले आहेत. टेकक्रंच या इंग्रजी टेक साइटने सर्वप्रथम ही माहिती दिली. 

हे सुद्धा वाचा : Jioची भन्नाट ऑफर! JioFiber कनेक्शन बुकसाठी तुम्हाला एक रुपयाही भरावा लागणार नाही, बघा डिटेल्स

या प्रकरणावर भाष्य करताना Xiaomi इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही इतर मुख्य व्यवसाय सेवांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मार्च 2022 मध्ये Mi Financial Services बंद केली. 4 वर्षांच्या अल्प कालावधीत, आम्ही हजारो ग्राहकांना जोडण्यात आणि त्यांना समर्थन देण्यात सक्षम झालो. आम्ही आमच्या भागीदारांसोबत काम करत आहोत आणि या प्रक्रियेदरम्यान आमच्या ग्राहकांना पाठिंबा देत आहोत. आम्ही आमची उत्पादने आणि सेवांसह भविष्यात प्रत्येकासाठी नवीनतम तंत्रज्ञान आणि नावीन्य आणत राहू." 

Mi Pay तीन वर्षांपूर्वी लाँच करण्यात आला होता. Mi Pay ऍपद्वारे, वापरकर्ते पैसे ट्रान्सफर करू शकतात आणि सर्व प्रकारची पेमेंट करू शकतात. Mi Pay ऍप देखील नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ऍप्सच्या यादीतून गायब झाले आहे. त्याबरोबरच, भारतात Xiaomi विरोधात टॅक्सबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती देखील आहे. 

Xiaomi ची भारतातील बँक खाते फ्रिज करण्यात आले असून, जवळपास 5,500 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. या प्रकरणी Xiaomi ने कर्नाटक हायकोर्टातही संपर्क साधला होता, पण कोर्टाने सुनावणीस नकार दिला. Xiaomi विरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ऍक्ट FEMA अंतर्गत खटला सुरू आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :