आज लाँच होणार श्याओमी Mi पॅड २ टॅबलेट

आज लाँच होणार श्याओमी Mi पॅड २ टॅबलेट
HIGHLIGHTS

Mi पॅड 2 टॅबलेटची इमेजसुद्धा लीक झाली आहे, ज्यात त्याच्या बॅक पॅनलमध्ये उजव्या बाजूला रियर कॅमेरा दिला गेला आहे. मात्र ह्यात LED फ्लॅश नाही. हा डिवाईस मेटल बॉडी डिवाईसने बनला आहे. बाजूला वॉल्यूम रॉकर बटन आणि पॉवर बटन दिले गेले आहे.

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी श्याओमी लवकरच बाजारात आपला नवीन टॅबलेट Mi पॅड 2 लाँच करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, श्याओमी Mi पॅड 2 टॅबलेटला आज लाँच केले जाईल.

 

खरे पाहता कंपनीकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, श्याओमी आज एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, जेथे श्याओमी नोट 2 प्रो स्मार्टफोनसह Mi पॅड 2 टॅबलेट लाँच करेल.

Mi पॅड 2 टॅबलेटची इमेजसुद्धा लीक झाली आहे, ज्यात त्याच्या बॅक पॅनलमध्ये उजव्या बाजूला रियर कॅमेरा दिला गेला आहे. मात्र ह्यात LED फ्लॅश नाही. हा डिवाईस मेटल बॉडी डिवाईसने बनला आहे. बाजूला वॉल्यूम रॉकर बटन आणि पॉवर बटन दिले गेले आहे.

आधी झालेल्या लीक्सनुसार, श्याओमी आपल्या टॅबलेट Mi पॅड ला इंटेल चिपसेटसह सादर करेल. अलीकडेच चीनी वेबसाइट गीकबेंचवर ह्या टॅबलेटला लिस्ट केले गेले आहे, जेथून ह्या डिवाईसची स्पेसिफिकेशन लीक झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्याओमी Mi पॅड 2 टॅबलेट 2.2GHz क्वाडकोर प्रोसेसर आणि 2GB रॅमने सुसज्ज आहे.

त्याचबरोबर ह्यात 16GB चे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. हा डिवाइस विंडोज आणि अॅनड्रॉईड दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. अॅनड्राईड ऑपरेटिंग सिस्टम 5.1 लॉलीपॉपवर आधारित आहे. हा टॅबलेट इंटेल एक्स जेड8500 चिपसेटवर चालतो. श्याओमी Mi पॅड 2 टॅबलेटला मेटल फ्रेमसह सादर केले आहे.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo