मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी श्याओमीने आज चीनमध्ये एका कॉन्फरन्स दरम्यान आपला नवीन टॅबलेट Mi पॅड 2 लाँच केला आहे. कंपनीने नवीन टॅबलेटलासुद्धा मेटल बॉडी फिनिश दिली आहे. श्याओमी Mi पॅड 2 ला फक्त चीनमध्ये लाँच केले आहे, ज्याची किंमत युआन 999(जवळपास १०,४०० रुपये) इतकी आहे.
ह्या टॅबलेटच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्यात ७.९ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन 2048×1536 पिक्सेल आहे. त्याचबरोबर हा टॅबलेट एटम X5-Z8500 चिपसेटसह सादर करेल. ह्यात २.२४GHz चे ६४ बिट्सचे 14NM क्वाडकोर प्रोसेसर दिले गेले आहे. ह्यात 2GB रॅम आहे. ह्यात 16GB आणि 64GB चा अंतर्गत स्टोरेजचा पर्याय दिला आहे.
त्याचबरोबर ह्यात ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. Mi पॅड २ मध्येे ६,१९०mAh बॅटरी दिली गेली आहे. हा अॅनड्रॉईड आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमसह उपलब्ध आहे. शाओमी Mi पॅड 2 टॅबलेटचे अॅनड्रॉईड संस्करण मीयुआय 7 वर काम करतो. तर विंडोज संस्करण टॅबलेट मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 वर आधारित आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात USB टाइप-C उपलब्ध आहे. त्याचबरोबर ह्यात ब्लूटुथ, वायफाय दिला गेला आहे. त्याची जाडी मात्र 6.95mm आहे. ह्याचे वजन 322 ग्रॅम आहे. हा टॅबलेट ग्रे आणि गोल्ड रंगात उपलब्ध होईल.