ह्या नवीन बॅटरीचे नाव रेनबो 5 AA ठेवण्यात आले आहे. ह्या आकर्षक अशा बॅटरीची किंमत ९.९ चीनी युआन(जवळपास 100 रुपये) आहे. ही बॅटरी १० सेल्सच्या पॅकसोबतच येईल.
मोबाईल डिवायसेस कंपनी श्याओमीने आपल्या लिस्टमध्ये आणखी एका प्रोडक्टचा समावेश केला आहे. ह्यावेळी कंपनीने अशी बॅटरी आणली आहे, जी ७ वर्षापर्यंत चार्ज राहू शकते. कंपनीने ह्या बॅटरीचे नाव रेनबो 5 AA ठेवले आहे. ह्या सुंदर बॅटरीची किंमत ९.९ चीनी युआन (जवळपास 100 रुपये) आहे. ही बॅटरी १० सेल्सच्या पॅकसोबतच येईल.
ही बॅटरी चीनच्या बाहेर लाँच होणार की नाही, ह्याबाबत सध्यातरी काही सांगता येणार नाही. मात्र कंपनीचा दावा आहे की, जर ही बॅटरी वापरली नाही तर ती ७ वर्षांपर्यंत चार्ज राहू शकते.
Mi रेनबो AA बॅटरी कंपनीच्या सप्लायर Zmi ने बनवली आहे. हाच सप्लायर श्याओमी Mi पॉवर बँक्ससुद्धा बनवतो.
हल्लीच श्याओंमीने आपला Mi USB पंखा लाँच केला होता. कंपनीने ह्या पंख्याची किंमक २४९ रुपये ठेवळी आहे. ह्या डिवाइसला ऑनलाइन स्टोर खरेदी करु शकता. त्याचबरोबर हल्लीच IDC ने दिलेल्या सर्वेनुसार, श्याओमीने जागतिक स्तरावर ६ टक्के स्मार्टफोनचा व्यवासाय गिळंकृत केला आहे. त्यानंतर लिनोवो आणि हुआवेचा नंबर लागतो. श्याओमी जगातील पाचवी सर्वात मोठी स्मार्टफोन बनवणारी कंपनी बनली आहे.