Xiaomi Independence Day सेल मी.कॉम वर 12 ऑगस्ट पर्यंत चालेल.
Xiaomi India ने आपल्या वेबसाइट वर इंडिपेडन्स डे सेल चे आयोजन केले आहे. हा सेल 12 ऑगस्ट पर्यंत मी.कॉम वर चालेल. Mi Mix 2 वर कंपनी ने 5000 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे त्यामुळे हा डिवाइस 24,999 रुपयांच्या ऐवजी 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर Mi Max 2 वर 1000 रूपये आणि Mi Band 2 वर 200 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.
Xiaomi mi mix 2 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. डिवाइस मध्ये 5.99 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचे रेजोल्यूशन 1080×2160 पिक्सल आहे. या स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर प्रोसेसर आणि 6GB रॅम आहे. डिवाइस मध्ये 3400mAh ची नॉन रिमूवेबल बॅटरी आहे. Xiaomi Mi MIX 2 मध्ये 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
Xiaomi Redmi Note 5 Pro आणि Mi LED TVs ला पण कंपनी ने या ओपन सेल मध्ये सादर केले आहे. हे डिवाइसेज ओपन सेल मध्ये उपलब्ध होतील आणि आउट ऑफ स्टॉक होण्याची भीती नाही.